नाशिक Two Children Drowned in Water : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात खामखेडा गावातील बुटकेश्वर शिवारात कांदा काढणी सुरु असताना शेतात आलेल्या माकडांना हुसकावून लावण्यासाठी दोन भाऊ प्रयत्न करत होते. यावेळी दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेमुळं संपुर्ण खामखेडा परिसरात शोककळा पसरलीय.
दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातील खामखेडा गावातील बुटकेश्वर शिवारातील शेतकरी गणेश संतोष आहेर हे त्यांच्या शेतात राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर (12) मानव आहेर (8) हे बुधवारी शाळेतून घरी आल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शेतात उन्हाळा कांदा काढणी सुरु असल्यानं आई-वडिलांच्या मदतीसाठी शेतात आले होते. सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई आहे. त्यामुळं पाण्याच्या शोधत माकड शेतात आल्यानं त्यांना दोन भावांनी हुसकावून लावले. तेव्हा घरी येत असताना दोघांचा शेततळ्यात बडून मृत्यू झाला. तेजस आहेर हा इयत्ता सहावीत तर मानव आहेर हा जिल्हा परिषद इयत्ता दुसरीत शिकत होता.
अशी घडली घटना : उन्हाळ्यामुळं पाण्याच्या शोधात वन्यप्राणी प्राणी हे गावाकडे येत असतात. जंगलातून शेतात आलेल्या माकडांच्या झुंडीना हुसकावून लावण्यासाठी तेजस व मानव हे दोन्ही भाऊ त्यांच्या पाठीमागं गेले. माकड हुसकावून परतताना एका शेतातील शेततळ्यात ते पाणी पाहायला गेले. अशातच मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानव गेला असता तोही शेततळ्यात घसरला. त्यांच्यासोबत असलेल्या चार वर्षीय चुलत बहिणीनं शेताकडं पळत येऊन आपल्या काकांना ही घटना सांगितली. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र, शेततळे अर्ध भरलेलं असल्यानं दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.
हेही वाचा :
- Youths Drowned During Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गेलेले तीन युवक बुडाले; सावली येथील आसोलामेंढा येथील घटना
- Nanded Accident News: वर्ग मित्रांची भेट ठरली शेवटची, गोदावरी नदीत आयटीआयच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
- PM Commondo News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील 'त्या' कमांडोचा पाण्यात बुडून मृत्यू; अखेर मृतदेह सापडला