नाशिक Nashik Bilwatirtha Incident : त्र्यंबकेश्वर येथील निलपर्वतामागील पायथ्याशी बिल्व तिर्थावरील तलाव आहे. या ठिकाणी परिसरातील तनुजा कोरडे आणि अर्चना धनगर या तेरा वर्षीय मैत्रीणी कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मुली तलावात बुडाल्या ही घटना अर्धा तासांनी कळल्यानंतर ग्रामस्थांनी दोघींना पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची पाण्यासाठी वणवण : त्र्यंबक नगरपरिषदेकडून शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिक पिण्यासाठी जार विकत घेतात. मात्र, वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने मिळेल तेथून पाणी आणत असतात. कपडे धुण्यासाठी बिल्वतीर्थ तलावावर जातात. हा तलाव देवस्थान ट्रस्ट मालकीचा असून, काही वर्षांपूर्वी गाळ काढला तेव्हा काही ठिकाणी तो जास्त खोल करण्यात आला आहे. या आधी त्यात बापलेकांचा जीव गेला होता. देवस्थान ट्रस्टने तलावाभोवती संरक्षक भिंत बांधावी आणि सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी केली जात आहे.
औरंगाबादमध्येही अशीच दुर्घटना : औरंगाबादमध्ये 31 ऑगस्ट, 2024 रोजी तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील सलैया पोलीस स्टेशन हद्दीतील सोनारचक गावात ही घटना घडली होती. तलावात आंघोळ करताना हा अपघात झाला होता. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
राखी बांधून मुलं आंघोळीला गेली : मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधन निमित्तानं आधी सर्व मुलांनी राखी बांधली, नंतर मित्रांसोबत ते जवळच्या तलावात आंघोळीसाठी गेले होते. तलावात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं सर्व मुलांचा बुडून मृत्यू झाला. काही वेळानं एक गावकरी तिथं पोहोचल्यावर त्याला मुलांचे कपडे तिथ पडलेले दिसले. त्यानं आजूबाजूला बघितलं असता तिथं मुलं आढळून आले नाहीत.
सर्वांचे मृतदेह बाहेर काढले : गावकऱ्यानं या घटनेची माहिती तात्काळ गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी तलावाकडं धाव घेत मुलांचा शोध सुरू केला. तेव्हा तलावात मुलांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळं परिसरातील नागरिकांनी तलावाजवळ एकच गर्दी केली होती. एकाच गावातील मुलांच्या मृत्यूमुळं परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
- मंत्रिपदासाठी आम्ही वाट पाहायला तयार, कॅबिनेट पद पाहिजे होतं पण....; अजित पवारांची प्रतिक्रिया - Ministerial Allotment
- नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, मंत्रिमंडळात 60 हून अधिक नेत्यांचा समावेश - Narendra Modi Takes Oath as PM
- 'गडकरी ते रोडकरी'; भाजपाचा पोस्टरबॉय ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या थक्क करणारा राजकीय प्रवास - Nitin Gadkari Political journey