मुंबई : Theft at Anupam Kher office : ज्येष्ठ अभिनेता अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयातील चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त राज तिलक रोशन यांनी दिली आहे. या प्रकरणी माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान नावाच्या दोघांना जोगेश्वरीतून अटक करण्यात आली आहे.
गुरवारी पहाटे अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरी वीरा देसाई रोड येथील कार्यालयात चोरी झाली होती. अकाउंट डिपार्टमेंटमधील तिजोरी आणि अनुपम खेर यांच्या कंपनीद्वारा निर्मित चित्रपटाचे रील घेऊन चोर फरार झाले होते. कार्यालयातील दोन्ही दरवाजाचे कोयंडे तोडून चोरांनी प्रवेश केला होता. तिजोरी आणि चित्रपटाचे रील घेऊन पळताना चोर सीसीटीव्हीत कैद झाले होते. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिनेअभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोन आरोपीना अटक करून चोरीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. 19 जूनला रात्री नऊ वाजता कार्यालय बंद केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ साडेनऊ वाजता उघडण्यात आले. यासाठी अनुपम खेर यांचे व्यवस्थापक तिथं पोहोचले त्यावेळी दरवाजाचा कोयंडा अगोदरच कोणीतरी तोडून कार्यालयात प्रवेश केला असल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश करून तिजोरीत ठेवलेले चार लाख पंधरा हजार आणि अनुपम खेर यांनी निर्मित केलेल्या चित्रपटाची रील असलेली बॅग लंपास केली होती. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी रफिक मजीद शेख वय 35 आणि मोहम्मद दिलशाद अब्दुल खान वय 30 वर्षे या दोन आरोपींना 21 जूनला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम 34 हजार, फिल्मची रिल व दोन हजार रूपये किमंतीची लोखंडी तिजोरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.
हेही वाचा -
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Anupam Kher
रस्त्यावर आढळली शेकडो मतदान कार्ड; बनावट असल्याचा संशय, गुन्हा दाखल - loksabha election 2024