नागपूर Nagpur Hit and Run : मुंबईतील वरळी आणि पुणे येथील 'हिट अँड रन' प्रकरणात ताजं असताना आता उपराजधानी नागपुरात सुद्धा 'हिट अँड रन'च्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. पहिल्या घटनेत स्कूल बसच्या धकडेत एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत जेवण झाल्यानंतर खर्रा आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धकडेत मृत्यू झाला आहे.
स्कूल बसच्या धडकेत वृद्ध ठार : पहिली घटना नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील छोटा ताजबाग ते तुकडोजी पुतळा चौक परिसरात घडली आहे. रत्नाकर रामचंद्र दीक्षीत (63) हे त्यांच्या सायकलनं काही कामानिमित्त या परिसरातून जात होते. त्याचवेळी स्कूल बस चालकानं निष्काळजीपणे भरधाव वेगात बस चालवली असता बसची धडक रत्नाकर दीक्षित यांच्या सायकलला लागली. त्यामुळं ते खाली पडले आणि बसच्या मागच्या चाकाखाली आले. यानंतर परिसरातील लोकांनी जखमी रत्नाकर दीक्षित यांना उपचाराकरता मेडीकल हॉस्पीटल इथं नेलं असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केलं. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी स्कूल बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
अज्ञात वाहनाची धडक : दुसऱ्या घटनेत जेवण झाल्यावनंतर मोटरसायकलनं खर्रा आणण्यास जाणाऱ्या राहुल टेकचंद खैरवार (23) या तरुणाला सांदीपनी शाळेसमोरील दाभा रिंग रोडवर अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली. ही धडक इतकी गंभीर होती की यात राहुल खैरवार गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी या तरुणास तपासून मृत घोषीत केलं. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालक आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :