ETV Bharat / state

ना वीज, ना रस्ता, ना पिण्यास पाणी; मेळघाटातील चार आदिवासी गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : मेळघाटातील आदिवासी गावात जाण्यात रस्ता नाही, पिण्यास पाणी नाही, आतापर्यंत वीजही नाही. त्यामुळे मेळघाटातील नागरिकांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Lok Sabha Election 2024
आदिवासी गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 1:53 PM IST

Updated : Apr 26, 2024, 2:25 PM IST

अमरावती Lok Sabha Election 2024 : देशभरात आज लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान सुरू आहे. मात्र अमरावतीतील मेळघाटात मतदारांना कोणत्याच सुविधा नाहीत. त्यामुळे मेळघाटातील चार गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यात धारणी तालुक्यात येणाऱ्या रंगूबेली, धोकडा, कुंड आणि खामदा या अतिदुर्गम गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आज अमरावती लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मतदान प्रक्रिया राबविली जात असताना या चार गावातील ग्रामस्थांनी मतदान करण्यास नकार दिला.

गावांमध्ये कुठल्याही सुविधा नाहीत : सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारे रस्ते नाहीत. या गावात कुठलं वाहन देखील पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. यासह वीज पुरवठा या चारही गावांमध्ये नाही, पिण्याचं पाणी देखील नाही. यासह आरोग्य सेवा देखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडं अनेकदा तक्रारी आणि निवेदनं सादर करून देखील गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांनी "आज आम्ही मतदान करणार नाही, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे," अशी भूमिका घेतली आहे.

गावातील मतदान केंद्र ओस : रंगूबेली धोकडा, कुंड आणि खामदा या गावांमध्ये मतदान केंद्रांवर गावातील एकही नागरिक सकाळी सात वाजल्यापासून फिरकला नाही. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडलं आहे. प्रशासनाच्या वतीनं ग्रामस्थांनी मतदान करण्यासंदर्भात बरेच प्रयत्न केले, मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नागरिकांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानं प्रशासनाकडून नागरिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला यश आलं नाही.

हेही वाचा :

  1. बुलढाण्यात मतदानाला सुरुवात; अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज मतदान, कोणते उमेदवार आहेत रिंगणात? - lok sabha election 2024
  3. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान सुरू; राहुल गांधी, ओम बिर्ला, पप्पु यादव यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला - Lok Sabha Election Phase 2

Last Updated : Apr 26, 2024, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.