ETV Bharat / state

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : अमितेशकुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर रवींद्र सिंगल यांच्याकडे नागपूरची धुरा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 10:47 PM IST

IPS Officer Transfer : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना विद्यमान ठिकाणावरुन तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Amitesh Kumar
अमितेशकुमार, रवींद्र सिंगल

नागपूर IPS Officer Transfer : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पोलीस सेवा (IPS) तसंच राज्य पोलीस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारनं जारी केलं आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना बढती देऊन होमगार्डचा पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असलेले अमितेश कुमार आता पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत.

रवींद्रकुमार सिंघल नागपूरचे पोलीस आयुक्त : परिवहन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंघल हे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असतील. गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची नक्षलवाद विरोधी मोहिमेसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती होऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजयकुमार बन्सल हे जालना जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक असतील. यापूर्वी अजयकुमार बन्सल हे मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

अमितेशकुमार सर्वाधिक काळ नागपूरचे पोलीस आयुक्त : 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी रवींद्र सिंघल यांची आज नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर अमितेशकुमार यांची पुणे शहर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलीस दलाच्या इतिहासात अमितेशकुमार यांनी सर्वाधिक काळ नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. नागपूरची कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अमितेशकुमार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

फडणवीस यांच्या गुडबुकमधील अधिकारी : गेल्या अनेक महिन्यांपासून नागपूर शहराला नवे पोलीस आयुक्त मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक वर्षाहून अधिक काळ पूर्ण झाला होता, त्यामुळं आज ना उद्या कोणत्याही क्षणी अमितेशकुमार यांची बदली होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याला वर्षभराहून अधिक काळ लोटला. अमितेशकुमार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील अधिकारी आहेत.

रवींद्र सिंघल यांच्यासाठी नागपूर नवं नाही : रवींद्र सिंघल यांनी यापूर्वी 2010 मध्ये नागपूर शहरात सेवा बजावली होती. एवढंच नाही, तर ते मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे पोलीस अधीक्षक म्हणूनही कार्यरत होते. 2010 ते 2013 पर्यंत रवींद्र सिंघल यांनी दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राचं संचालकपदही भूषवलं आहे.

1996 पासून महाराष्ट्रात कार्यरत : रवींद्र सिंगल यांनी 1990 साली दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगचं (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) शिक्षण घेतलं आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1996 पासून ते महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी म्हणून सेवा देत आहेत.

हे वाचलंत का :

  1. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा, ईडीनं घेतलं ताब्यात; चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री
  2. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तोपर्यंत सरकार निवडणूक घेणार नाही; जरांगे पाटील यांचं वक्तव्य
  3. अर्थसंकल्पात कृषीसाठी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता - डॉ अजित नवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.