ETV Bharat / state

झारखंडमधील कंपनीची ५ कोटी ८९ लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - EMMAR EMPLOYEES PRIVATE LIMITED - EMMAR EMPLOYEES PRIVATE LIMITED

Company Fraud In Jharkhand : झारखंड मधील समृद्धी स्पॉंज लिमिटेड कंपनी आणि एम्मार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची बनावट इन्व्हाईस आणि बिले सादर करून मुलुरा लॉजिस्टिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 5 कोटी 89 लाख 38 हजार 450 एवढ्या रकमेची फसवणूक केली. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे यांनी दिली आहे.

Company Fraud In Jharkhand
कंपनी फसवणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 10:09 PM IST

मुंबई Company Fraud In Jharkhand : झारखंड स्थित समृद्धी स्पॉंज लिमिटेड कंपनी आणि एम्मार एम्प्लॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कायदेशीर सल्लागार राजदीप सैनी (वय 63) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष अय्यर, व्ही भास्कर आणि सुधा भालचंद्र पै या तीन आरोपीं विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झारखंड राज्यातील सिंग भूम जिल्ह्यात असलेल्या आदितपूर समृद्धी स्पॉन्स लिमिटेड कंपनी आणि एम्मार एम्प्लॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये लोखंडाचे तुकडे तयार करण्याचं काम केलं जातं. या कंपनीला लोखंडी दगडाच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. त्यासाठी शासनाच्या लोखंडी दगडाच्या खाणी मधून माल उचलण्याची परवानगी घेते. मध्यप्रदेश मधील खजुराहो माईन्स आणि मोदी माईन्स तसंच आरोसा या राज्यातील खाणीतून कच्चा माल येतो. कच्चा माल वाहतुकीसाठी कंपनीची ट्रान्सपोर्टरची नेमणूक केली जाते. ट्रान्सपोर्ट कंपन्यांना वर्क ऑर्डर दिली जाते. मोदी माईन्स आणि खजुराहो माईन्स यांचे अंतर झारखंड स्थित कंपनी पासून 18 ते 19 तासांचे आहे. 2021 मध्ये एजंट फहीम खान याने कंपनीचे संचालक सुजित कुमार यांना मुलुरा लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कर्नाटकातील कंपनीची ओळख करून दिली. या कंपनीमध्ये मुदतसर मोहम्मद आणि दीपेश कोरंजरथ हे दोन संचालक होते. ही कंपनी ट्रान्सपोर्ट कंपनी असल्याने कंपनीने झारखंड स्थित फसवणूक झालेल्या दोन कंपनीस कच्चामाल पुरवण्यासाठी ट्रान्सपोर्ट पुरवून मोदी माईन्स आणि खजुराहो माईन्स या खाणी मधून माल पुरवण्याचे काम हाती घेतले. एक एग्रीमेंट देखील तयार करण्यात आले होते.

अशा प्रकारे झाली फसवणूक : फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांनी मुलुरा कंपनीस ऑर्डर दिल्या त्याप्रमाणे मुलुरा कंपनीने झारखंड स्थित कंपनीच्या प्लांटवर माल पुरवण्याचे काम चालू केले होते. त्यासाठी मुलुरा लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भुवनेश्वर येथील एस के आयलॉजिस्टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली होती. त्यानुसार एस के आय या कंपनीने स्थानिक ट्रान्सपोर्टरची नेमणूक करून फसवणूक झालेल्या कंपनीस माल पुरवण्याचे काम चालू केले होते. झारखंड मधील दोन्ही कंपन्यांकडून मुलुरा कंपनीस वेळच्यावेळी पेमेंट देखील मिळत होते. सुरुवातीला मुलुरा कंपनीने स्थानिक ट्रान्सपोर्टर कंपन्यांना आगाऊ पैसे देऊन त्याचे बिल झारखंड स्थित कंपन्यांना एक महिन्याने पाठवून देत होते. त्यानुसार मुलुरा कंपनीस बिलाप्रमाणे पैसे झारखंड मधील कंपन्या पाठवून देत होत्या.

यामुळे बळावला कंपनीचा संशय : जानेवारी 2022 मध्ये मुलुरा कंपनीस डीएचएल कंपनीने 100% शेअर्स खरेदी करून टेक ओव्हर केल्याने मुलुरा कंपनीचे संचालक संतोष अय्यर आणि सुधा पै हे असल्याचे झारखंड मधील कंपनीला कळाले. त्यानंतर प्रत्येक वेळेस संतोष अय्यर आणि सुधा पै यांनी डीएचएल कंपनीच्या मेल आयडी वरून झारखंड मधील कंपनीत मेल केला आणि मार्च 2022 मध्ये मुलुरा कंपनीने फसवणूक झालेल्या कंपनीकडे अंदाजे तीन कोटी 98 लाख 82 हजार 46 रुपयांचे बिल जास्तीचे मागितले. त्यावेळी झारखंड स्थित लोखंडाचे तुकडे तयार करणाऱ्या कंपनीचा संशय बळावला. मात्र बिलातील तफावत आढळून आली नाही.

जास्तीची रक्कम घेऊन पैशाचा अपहार : झारखंड मधील कंपन्यांनी मुलुरा कंपनीमध्ये जाऊन माहिती मागितली असता संतोष अय्यर आणि सुधा पै यांनी पाठीमागची बिले तसेच चलन तपासून बिलातील जास्त रकमेची तफावत सांगतो, असं म्हणून वेळकाढूपणा केला. त्यामुळे मुलुरा कंपनीस झारखंड मधील कंपनीने 24 एप्रिल 2022 पासून बिलाचे पैसे देणे बंद केले. तसेच मुलुरा कंपनीने इझीहॉल कंपनीच्या लेटरहेडवर इन्व्हाईस बिले पाठवली. तसेच मुलुरा कंपनीने पाठवलेली बिले ही तपासली. त्यामध्ये 24 सप्टेंबर 2021 व 29 सप्टेंबर 2021 रोजी झारखंड मधील कंपनीमध्ये कच्चामाल टाकलेल्या मोटर ट्रक क्रमांक तपासला असता हा क्रमांक होंडा मोटर सायकल आणि स्कूटर ही नागपूर महाराष्ट्र येथे रजिस्टर असल्याचं दिसून आलं. अशा प्रकारे मुलुरा कंपनीने झारखंड मधील कंपनीस नऊ करोड 44 लाख 48 हजार 79 एवढ्या रकमेची खोटी बिले सादर करून पाच कोटी 89 लाख 38 हजार 450 एवढी रक्कम जास्तीची घेऊन अपहार करून फसवणूक केली. म्हणून अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

  1. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रात मिशन 45 पूर्ण होईल - संजय शिरसाट - Sanjay Shirsat
  2. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीची एकही जागा निवडून देऊ नका; नरेंद्र, मोदी यांचं रामटेकच्या सभेतून आवाहन - Modi Sabha In Ramtek
  3. महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार धनुष्यबाणावरच लढणार - उदय सामंत - Lok Sabha Elections 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.