ETV Bharat / state

शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत: कोल्हेंच्या संस्थांवर सरकारी यंत्रणेची छापेमारी; कारण गुलदस्त्यात - Teacher Constituency Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 10:11 AM IST

Teacher Constituency Election 2024 : नाशिक शिक्षण मतदार संघाची निवडणूक रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. शिक्षक मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विवेक कोल्हे यांच्या संस्थांवर सरकारी यंत्रणांची छापेमारी सुरू आहे.

Teacher Constituency Election 2024
विवेक कोल्हेंच्या संस्थांवर छापेमारी (Reporter)

शिर्डी Teacher Constituency Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर सरकारी यंत्रणेंनी छापेमारी केली. विवेक कोल्हेंनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी ही छापेमारी केली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र यावर कोल्हेंनी अद्यापही स्पष्टीकरण दिलेलं नसल्यानं छापेमारीचं कारण गुलदस्त्यातच आहे.

शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत : देशातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली. या निवडणुकीत जवळपास 36 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधु डॉ राजेंद्र विखे पाटील, तसेच कोपरगाव येथील भाजपाचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे त्याचबरोबर महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

15 जणांची माघार तर 21 जण रिंगणात : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 36 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र बुधवारी उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ राजेंद्र विखे पाटलांसह इतरही 14 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात 21 जण उरले आहेत. यात महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे, महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासह अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

कोल्हेंच्या संस्थांवर सरकारी यंत्रणेंची छापेमारी : कोपरगाव येथील विवेक कोल्हेंनी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी कोल्हेंच्या संबंधित असलेल्या कोपरगाव येथील महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना तसेच संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था यांच्यावर राज्यातील विविध सरकारी यंत्रणेच्या पथकांनी 12 जूनला छापेमारी केली. आतापर्यंत तिसऱ्यांदा सरकारी यंत्रणेनी कोल्हेच्या संस्थांवर छापेमारी केली. मात्र चौकशीत अद्याप काही गैरप्रकार आढळले नसल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या संदर्भात सरकारी अधिकारी आणि विवेक कोल्हे प्रसारमाध्यमांसमोर कधी माहिती देणार ? याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. विधान परिषद निवडणूक 2024 : महाविकास आघाडीत ठिणगी, नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी, काय आहे वादाचं कारण ? - Tensions in MVA Over MLC polls
  2. Maharashtra MLC Election: अमरावती पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाडे विजयी
  3. Aurangabad Graduate Constituency Election : मराठवाडा शिक्षक मतदार संघात पुन्हा राष्ट्रवादीची सरशी, विक्रम काळे चौथ्यांदा विजयी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.