ETV Bharat / state

मुंबईत एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात, तिघांचा मृत्यू - Mumbai Accident News - MUMBAI ACCIDENT NEWS

Mumbai Accident News : मुंबईत रविवारी तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात (Mumbai Accident) तिघांचा मृत्यू झाला. मुंबईतील विक्रोळी, खार आणि पवई भागात हे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai Accident News
मुंबई अपघात (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 9:50 PM IST

मुंबई Mumbai Accident News : पुणे पोर्शे कार अपघातात दोघांचा मृत्यू झालेला असताना मुंबईत रविवारी तीन अपघात (Mumbai Accident) झाले असून तीन बाईकस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पवई येथे स्कूटरवरून जात असताना डंपरनं धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. डंपर चालकाला पोलिसांनी अटक केलीय. तर खार येथे भरधाव वेगानं जात असलेल्या होंडा जॅझ कारनं डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरला धडक दिलीय. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. खार पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केलीय.

पहिली घटना : पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांजूरमार्ग येथे राहणारा आणि एल अँड टी पवई येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अतुल खरोसे याचा अपघातात मृत्यू झालाय. रविवारी सायंकाळी अतुल हे जेव्हीएलआर रोडवरून पवई प्लाझा सिग्नलजवळ त्यांच्या स्कूटरवरून कामावर जात असताना एमएच 03 ईजी 1959 क्रमांकाच्या डंपरनं त्यांच्या स्कूटरला मागून धडक दिली. या धडकेने अतुल खरोसे हे डंपरच्या मागील चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, अपघाताची माहिती मिळताच पवई पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी खरोसे यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

नाईट शिफ्टला जाताना घडली घटना : अतुल खरोसे यांची पत्नी अलका हिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डंपर चालक आरोपी रमजान रज्जाक नदाफ याला अटक केली. तक्रारीत अलकानं म्हटलं की, तिच्या पतीची नाईट शिफ्ट होती आणि रविवार हा त्यांचा नियमित सुट्टीचा दिवस असला तरी तातडीच्या कामामुळं त्यांना कामावर बोलावण्यात आलं होतं. पवई पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, मृतकची पत्नी अलका खरोसे यांच्या तक्रारीच्या आधारे, रमजान रज्जाक नदाफ विरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 304A , 338 , 279 तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांसह एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दुसरी घटना : खार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सिंह (वय 27) हा रविवारी अंधेरीहून खार येथे इडलीचे पीठ पोहोचवत होता. दुपारच्या सुमारास वीरेंद्र 17व्या जंक्शनवर निलम फूडलँडसमोर आला असता भरधाव वेगात असलेल्या होंडा जॅझ कारनं स्कूटरला धडक दिली. त्यात वीरेंद्र गंभीर जखमी झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वीरेंद्रला गंभीर अवस्थेत वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. खार पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी प्रमिला कमलेश खुबचंदानी (वय 45) हिला अटक केली आहे. प्रमिला कमलेश खुबचंदानी या खारमधील नर्गिस दत्त रोडवर राहतात. मृत वीरेंद्रचा भाऊ सतेंद्र सिंग याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रमिलाविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम २७९ आणि ३०४ ए अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात प्रमिलाला जामीन मंजूर झाला आहे.

तिसरी घटना : विक्रोळी महामार्गावर टेम्पोच्या धडकेत २९ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मृत इसम विक्रोळी येथे राहत असून ते महालक्ष्मी येथील कार्यालयात जात होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नेचर बास्केट या खासगी कंपनीत काम करणारा लवकुश यादव रविवारी विक्रोळी येथून महालक्ष्मी येथील त्यांच्या ॲक्टिव्हाने कार्यालयाकडं जात होता. विक्रोळी पुलाजवळून जात असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोनं त्यांना धडक दिल्यानं ते गंभीर जखमी झाले. लवकुशला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. लवकुश हा पत्नी आणि दोन मुलांसह विक्रोळी येथे राहत होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, टेम्पो चालक बळीराम यादव याने लवकुशच्या ॲक्टिव्हाला धडक देऊन तेथून पळ काढला. या अपघातात लवकुशच्या डोक्याला दुखापत झाली. लवकुशचा मोठा भाऊ अरुण यादव यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपी बळीराम यादव विरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 279, 304A आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

हेही वाचा -

  1. अपघातानं केला कुटुंबावर घात; बाप-लेकाचा मृत्यू तर माय-लेकी बचावल्या
  2. नवी मुंबईत भीषण अपघात; एक ठार, तर दोघं गंभीर जखमी
  3. Mumbai Accident News : भरधाव कारच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.