ETV Bharat / state

कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, मात्र स्टंटबाज तरुणाईमुळे जीवितहानी होण्याची शक्यता - Kondeshwar Falls - KONDESHWAR FALLS

Kondeshwar Falls : पावसाळा सुरू झाल्याने सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या बदलापूरनजीक असलेला कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे; मात्र काही हुल्लडबाज पर्यटकांमुळे त्यांना येथील जलकुंडात जीवसुद्धा गमवावा लागत आहे. यावर खबरदारी म्हणून प्रशासनाने येथे सूचनांचा बोर्डसुद्धा लावलेला आहे. परंतु, यालासुद्धा पर्यटक जुमानत नसल्याचं आढळतय.

Kondeshwar Falls
कोंडेश्वर धबधब्यावर जमलेले पर्यटक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 9:15 PM IST

ठाणे Kondeshwar Falls : सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या बदलापूरनजीक असलेला कोंडेश्वर धबधबा हा राज्यात प्रसिद्ध असलेलं पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक आनंद लुटतात; मात्र काही उत्साही पर्यटक या धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. या मंदिराच्या मागे मोठमोठे कुंड आहेत ते पाण्याखाली गेले की पर्यटकांना या कुंडांचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा त्या कुंडात अडकून अनेक तरुणांचा जीव गेला आहे. त्यामुळं या ठिकाणी जाताना प्रत्येक पर्यटकाने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असल्याचं दिसून येत आहे.

कोंडेश्वर धबधब्यावर जमलेली पर्यटकांची गर्दी (ETV Bharat Reporter)

कोंडेश्वर धबधबा करतोय पर्यटकांना आकर्षित : सह्याद्री पर्वतांच्या रांगेत हिरवीगार मखमल पांघरलेला हा निसर्गाच्या सानिध्यात असलेला बदलापूर शहरापासून ६ ते ७ किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो; मात्र पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना संपत आलाय तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणे परिसरात थोडाफार पाऊस येऊन गेला आहे. याच पावसामुळे कोंडेश्वर धबधबा काही प्रमाणात वाहताना दिसत असल्यानं या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे, पावसाने जरी दडी मारली असली तरीही निसर्गाच्या कुशीत आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात याठिकाणी येऊन आनंद मिळवताना दिसतात.

प्रशासनाची नोटीस, पण पर्यटकांचे दुर्लक्ष : कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जुलै महिन्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यातच पावसाचा जोर वाढला की, कोंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेले मंदिर आणि कुंड पाण्याखाली जातात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार दरवर्षी नोटीस काढत पर्यटकांना या धबधब्याजवळ येण्यास मनाई करते; मात्र काही उत्साही पर्यटक या धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. आतापर्यंत गेल्या पाच ते सहा वर्षांत या ठिकाणच्या परिसरात ७० हून अधिक तरुण-तरुणीचे जीव गेले आहेत. त्यामुळे बदलापूरच्या कोंडेश्वर आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगांचा आनंद लुटायचा असेल तर स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, असं आवाहन दरवर्षी मंदिर व्यवस्थापन समिती तर्फे आणि स्थानिक पोलीस प्रशासनकडून करण्यात येते.

पर्यटकांची मद्यपान करून हुल्लडबाजी : पावसाळ्यात पर्यटनस्थळे, नदी किनारा, धबधबे परिसरात पावसात पिकनिक करण्याची ओढ पर्यटकांना लागत असते. चांदप गावचे हद्दीतील बारवी धरण परिसरातही पावसाळ्याच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात; मात्र काही वेळेस पर्यटक हे मद्यपान करून हुल्लड घालत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी खोल आणि वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यामुळे नागरिकांना जीव जाऊन अशा दुर्घटना घडल्या आहेत. तरी देखील कोंडेश्वर परिसरातील धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी तसेच चांदप गावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते बारवी धरण या भागात शनिवार, रविवार या सलग सुट्टीमुळे पर्यटकांकडून मोठी गर्दी केली जाते.

पर्यटक काही ऐकेना : कोंडेश्वर धबधब्याच्या शेजारीच महादेवाचे प्राचीन शिवमंदिर असल्यामुळे या ठिकाणी भाविक दर्शनासोबत पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात; मात्र गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देखील अशा प्रकारची बंदी घातली जाते की नाही याची उत्सुकता पर्यटकांना लागून राहिली आहे.

हेही वाचा :

  1. अमरावतीत कार्यालयावरून भाजपा-काँग्रेसमध्ये संघर्ष : खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूरांसह 15 जणांवर गुन्हा दाखल - Amravati MP Office Dispute
  2. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची राज्य सरकार करू शकतं घोषणा; निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णयाची शक्यता - Loan Waiver For Farmers
  3. जगण्याची वाट बिकट! जीवावर उदार होऊन महिलांसह विद्यार्थ्यांना करावा लागतो नदीतून प्रवास - FLOOD IN BORVAN RIVER

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.