ETV Bharat / state

महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा विचार करण्याची गरज नाही, माझे सर्व मित्र - श्रीमंत शाहू महाराज

Shrimant Shahu Maharaj : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असून, महाविकास आघाडीच्या विरोधात कोणता उमेदवार दिला जाणार याकडं सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. यावर श्रीमंत शाहू महाराज यांनी जास्त विचार करण्याची गरज नसल्याचं सूचक विधान केलं आहे. महायुतीचा उमेदवार कोण असेल, सगळे माझे मित्र आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Shrimant Shahu Maharaj
श्रीमंत शाहू महाराज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 9:57 PM IST

श्रीमंत शाहू महाराज यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर Shrimant Shahu Maharaj : कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे आज छत्रपती गटाच्या मेळाव्याचा समारोप झाला. या मेळाव्याला जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, आजरा, भुदरगड, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्रीमंत शाहू महाराज या मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले की, मेळाव्याची सुरूवात झाली आहे. कोणीतरी याची सुरुवात करायला हवी. आता ती मेळाव्यातून सुरू झाली आहे.

एकजुटीनं राहण्याचं आवाहन : यावेळी महाराजांनी कार्यकर्त्यांना गटबाजी विसरून जनतेचा कौल समजून एकजुटीनं राहण्याचं आवाहन केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जनतेचा संवाद सुरू आहे. छत्रपती घराण्याचं प्रेम किंचितही कमी झालं नसल्याचं यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. संयोगिताराजे छत्रपती, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी. पाटील, स्वराज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

बिनविरोध निवड करणं लोकशाहीत मान्य नाही : महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराजांचं नाव निश्चित आहे, तर महायुतीकडून कोण उमेदवार असेल याचा मला विचार करण्याची गरज नाही. सगळेच माझे मित्र आहेत. लोकशाहीत अनेक उमेदवार असू शकतात, चिन्ह आणि पक्षाबद्दल माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहित आहे. जे तुम्हाला कळालं तेच योग्य आहे.
निवडणूक बिनविरोध करणं लोकशाहीत योग्य नसल्याचं मत शाहू महाराजांनी व्यक्त केलं.

छत्रपती गट म्हणून सक्रिय राहणार : जुना राजवाडा येथे झालेल्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी राजे यांनी आता कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, कोल्हापूरच्या जनतेनं छत्रपती घराण्यावर अमाप प्रेम केलं आहे. याची जाणीव मला मतदारसंघात फिरताना झाली. छत्रपती गट म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावं, समन्वयकाची भूमिका महत्त्वाची असेल. आता राजवाड्यावर गुलाल घेऊनच या, असं आवाहन महाराजांनी कार्यकर्त्यांना केलंय.

हे वाचलंत का :

  1. State Cabinet Meeting : आठवड्यातील तिसरी मंत्रिमंडळ बैठक, शासन निर्णयांचा धडाका
  2. काँग्रेस आणि इंदिरा गांधीचं 'नंदुरबार'शी काय आहे नातं? नेहरूंपासूनची परंपरा राहुल गांधींनीही ठेवली कायम
  3. Narayan Rane रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.