पुणे : Rohit Pawar criticizes Tanaji Sawat : आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. तसंच, मी केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य नसेल तर सावंतांनी सांगावं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत मी समोरासमोर बोलायला तयार असल्याचं आव्हानही त्यांनी दिलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. रोहित पवारांनी यावेळी आरोग्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली.
आरोग्यमंत्र्यांनी राज्याला भिकारी केलं : निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हीजी आणि सुमित कंपनीवर मोठी मेहरबानी दाखवली जात आहे. तसंच, आरोग्य विभागामध्ये रुग्णवाहिका खरेदीमध्ये सुमारे 6 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे असा गंभीर आरोपच रोहित पवार यांनी केला आहे. त्याबरोबरच नियम आणि टेंडर डिझाईन करून कसं वळवलं गेलं याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत असंही ते म्हणाले आहेत. हा लढा सामान्य व्यक्तीचा आहे. (scam in health department) आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी हा घोटाळा केला असून, या पैशांचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. (health minister Tanaji Sawant) आरोग्यमंत्री सावंतांनी हा घोटाळा केला असून त्यांनी राज्याला भिकारी केलं आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी थेट मागणीच रोहित पवारांनी केली आहे.
नियमबाह्य पद्धतीने त्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचं कंत्राट : रुग्णवाहिका खरेदी घोटाळा कसा झाला याची यावेळी विस्तृत माहिती दिली आहे. ते म्हणाले, स्वच्छता कामं टेंडरमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी स्पॅनिश कंपनी यांना टेंडर दिलं गेलं होतं. त्यांच्यासोबत करार करण्यात आला होता. टेंडर हे सुमित कंपनी यांनी डिझाईन केला आणि त्यांनाच मिळालं. त्यांना स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसतानाही नियमबाह्य पद्धतीने त्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचं कंत्राट दिलं गेलं. तेव्हा, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या बीव्हीजी कंपनीलाही नाराज न करता त्यांना देखील टेंडरमध्ये सामावून घेण्यात आलं आहे असंही पवार म्हणाले आहेत.
'मी पाच दिवसांचा वेळ देतो' : पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित ही कंपनी आहे. या प्रकरणात साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे. सावंत यांना मी पाच दिवसांचा वेळ देतो. त्यांनी आपली बाजू मांडावी. आरोग्य विभाग हा खेकडा पोखरत असून येथे पारदर्शक प्रक्रिया राबवावी असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांनी खेकड्याने पोखरल्याने धरणांना गळती लागते असं विधान केलं होतं, या विधानावरून रोहित पवारांनी तानाजी सावंत यांना खोचक टोला लगावत डिवचलं आहे.
हेही वाचा :
3 पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्याला भीषण वादळाचा तडाखा; 5 जणांचा मृत्यू - Bengal Thunderstorm