ETV Bharat / state

एकीसोबत 'संबंध' तर दुसरीसोबत लग्नाची बोलणी, भारतीय हवाई दल कर्मचाऱ्याचा कारनामा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 12:21 PM IST

भारतीय हवाई दल कर्मचाऱ्यानं महिलेला गंडवल्याची बातमी समोर आलीय. एका महिलेशी लैंगिक संबंध ठेवले, त्याचवेळी दुसऱ्या महिलेशी लग्नाची बोलणी सुरू केली. त्यानंतर पीडित महिलेनं त्या कर्मचाऱ्याची पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर त्यानं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई Bombay High Court : भारतीय हवाई दल कर्मचाऱ्यानं एका तरुणीसोबत शरीर संबंध ठेवले, तर दुसरीसोबत लग्नाची बोलणी केली. मात्र हा कारनामा उघड झाल्यानं या प्रकरणामुळे त्याच्यावर फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयानं या कर्मचाऱ्याचा अटकपूर्वक जामीन अर्ज फेटाळून लावत 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुंबई पोलिसांकडं आत्मसमर्पण करावं लागेल, असे थेट आदेश दिलेत. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला.

अर्ज फेटाळला : या कर्मचाऱ्यानं विवाह पोर्टलवरुन दुसऱ्या महिलेसोबत हे सगळे व्यवहार केले, असा आरोप करत पीडित महिलेनं भायखळा- नागपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे या कर्मचाऱ्यानं मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयानं तो फेटाळून लावला.

दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा बेत : 18 मार्च 2022 रोजी एका महिलेशी या भारतीय हवाई दल कर्मचाऱ्याची विवाह पोर्टलवरुन ओळख झाली. ते एकमेकांना भेटू लागले, फिरले. तिला लग्नाबाबतचे त्यानं आश्वासन दिलं. त्यानंतर त्यानं वेगवेगळ्या ठिकाणी तिला फिरवलं. त्यानंतर त्यानं जून 2022 मध्ये आसाममधील तेजपूर या ठिकाणी तो कर्तव्यावर असताना, लग्नासाठी सुट्टी हवी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मला आश्वासन देऊन दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा याचा बेत आहे, अशी माहिती पीडितेच्या वकिलानं कोर्टात दिली.

ही फसवणूकच : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आपला निर्णय देताना, "भारतीय हवाई दलाचा हा कर्मचारी मार्च 2022 मध्ये एका महिलेसोबत लग्न ठरवतो. त्याच वेळेला दुसऱ्या महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करतो. जाणीवपूर्वक ही फसवणूकच आहे. त्यामुळे त्यानं दोन फेब्रुवारी 2024 पर्यंत भायखळा पोलिसांकडं आत्मसमर्पण करावं. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत आहोत," असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

हेही वाचा :

1 ट्रकनं बारा वाहनांना उडवलं, विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू

2 संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवारांचा पलटवार, 'विनाशकाले विपरीत बुद्धी' म्हणत केला हल्लाबोल

3 डीआरआयची मोठी कारवाई; शरीरात लपवून आणल्या कोकेनच्या 'इतक्या' कॅप्सूल, व्हेनेझुएलाच्या प्रवाशाला ठोकल्या बेड्याथराराक! ब्रेक निकामी झालेल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.