ETV Bharat / state

वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश; सितारा लॉजमधून थायलंडच्या १५ तरुणींची सुटका - Thane Crime News - THANE CRIME NEWS

Thane Crime News : शहरातील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसायाचं रॅकेट उघडकीस आलं आहे. पोलिसांनी सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे छापा टाकून थायलंडमधील १५ तरुणींची सुटका केलीय. ठाणे खंडणी विरोधी पोलीस पथकानं ही कारवाई केली आहे.

Thane Crime News
सितारा लॉजिंग अँड बोर्डीग (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 7:38 PM IST

ठाणे Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमधून आणलेल्या मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत अल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकानं सितारा लॉजींग अ‍ॅड बोर्डिंग सेक्शन १७, उल्हासनगर ३ येथे छापेमारी केली. यावेळी थायलंडमधील १५ तरुणी, २३ ग्राहक आणि ५.२७ लाखाची रक्कम हस्तगत केल्याची माहिती, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली.

बनावट ग्राहक पाठवून केली कारवाई : ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या माहितीनुसार, बुधवारी (२ ऑक्टोबर) रोजी पहाटे १.१० वाजण्याच्या सुमारास सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग, सेक्शन १७, उल्हासनगर येथे तीन बनावट ग्राहक पाठवून यशस्वी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत पोलीस पथकानं सितारा लॉजमध्ये मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग (३७) रा. सितारा लॉजिग अँड बोर्डिंग, सेक्शन नंबर १७, उल्हासनगर नं-३ याचासह चार कामगार यांना ताब्यात घेऊन थायलंड येथील १५ तरुणींची सुटका केली.

प्रतिक्रिया देताना सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे (ETV Bharat Reporter)

मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : सदर कारवाईत लॉजमधून ५,२७,००० रूपये रोख आणि इतर साधने जप्त करण्यात आली. तर छापेमारीत २३ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं. लॉजिंग आणि बोर्डिंगचे मॅनेजर आणि तेथे काम करणारे ४ कामगार यांच्या विरूद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता १४३ (१), १४३(३) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ आणि ५ प्रमाणे बुधवारी (२ ऑक्टोबर) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथक आणि पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. "ज्यांच्या मनातच 'शिवद्रोह' त्यांना महाराजांचा इतिहास काय कळणार", जयंत पाटील यांनी पुराव्यासह दिलं प्रत्युत्तर - Shivaji Maharaj Statue Collapse
  2. फलटणमधील हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळली ४ लाखांची खंडणी, महिलेसह सात जणांना अटक - Honeytrap Satara
  3. राजस्थानमधून मुंबई पोलिसांनी भामट्याला केली अटक, पोलीस अधिकाऱ्यांचे खोटे आयडी दाखवून करत होता कोट्यवधींची खंडणी वसूल - Fake police officers ID

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.