ETV Bharat / state

देशात निवडणुकीचे वारे, मात्र ठाण्यात सर्वकाही सामसूम; अख्ख्या भारतात एकमेव मतदारसंघ शांत - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Thane Election Campaign : लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद आहेत. हा प्रश्न निकाली न निघाल्यानं दोघांपैकी कुणीही प्रचाराला सुरुवात केलेली नाही. याचा फायदा उद्धव ठाकरे गटाने उचलत उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली.

Thane Election Campaign
ठाणे लोकसभा मतदारसंघ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 7:53 PM IST

Updated : Apr 11, 2024, 9:08 PM IST

ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराविषयी बोलाताना ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार

ठाणे Thane Election Campaign : एकीकडे लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. सर्वत्र राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सभा, राजकीय गाठीभेटी सुरू आहेत; मात्र ठाण्यात सर्वत्र शुकशुकाट आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांची एक फेरी पूर्ण झाली आहे; मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये जागावाटपावरून घोडं अडल्यानं येथे उमेदवार जाहीर झालेला नाही.

ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा गड : ठाणे लोकसभा मतदारसंघ आधीपासून काँग्रेस मग भाजपा आणि मग शिवसेना असा या मतदारसंघाचा प्रवास आहे. आनंद दिघे यांनी भाजपाचा खासदार असताना शिवसेनेसाठी उमेदवारी मागून घेतली आणि मग त्यावर आपली सत्ता कायम ठेवली; परंतु आता दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी घेत आपला गड शाबूत ठेवला. एकनाथ शिंदे यांची राजकीय जडणघडण ठाण्यातूनच झाली. शिवसेनेचा पहिला झेंडा ठाण्यातूनच फडकला. देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशा वेळी ठाण्यात मात्र कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. फक्त उबाठा गट कार्यरत असलेला दिसत आहे.

'या' दोन मतदारसंघात उमेदवारीचे घोंगडे भिजत : महायुतीत असलेल्या भाजपाने ठाण्यात आपले भले मोठे भाजपा कार्यालय सुरू करत भाजपा भविष्यातील निवडणुकासाठी तयार असल्याचं दाखवून दिलय. ठाणे लोकसभा क्षेत्रात ठाणे शहरात भाजपाचा आमदार आहे. एकनाथ शिंदे हे शिंदे गटाचे आमदार आहेत. अशावेळी माजीवाडामध्ये शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे उमेदवार आहेत. ऐरोलीमध्ये संदीप नाईक हे भाजपा आमदार आहेत तर बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे या भाजपाच्या आमदार आहेत. त्यामुळे भाजपा आणि सेना दोघांचे प्राबल्य या मतदारसंघात आहे. म्हणूनच या मतदारसंघात उमेदवारीचे घोडे भिजत पडले आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे. लवकरच हे चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही तो पर्यंत या ठाण्यात प्रचार सभा काही पाहायला मिळणार नाही. या संदर्भात शिंदे गटाकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता प्रवक्ते नरेश म्हक्से यांनी लवकरच उमेदवार दिला जाईल, असं सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून किरण सामंत निवडणूक लढवणार? काय म्हणाले दीपक केसरकर? - Lok Sabha Election 2024
  2. "एक पप्पू मेरी जिंदगी में आए"; कंगना रणौतनं उद्धव ठाकरेंना डिवचलं - Kangana Ranaut on Uddhav Thackeray
  3. रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस यांची मारहाणीसह आरोपांची सरबत्ती, तडस यांनी सर्व आरोप फेटाळले - Pooja Tadas On Ramdas Tadas

Last Updated : Apr 11, 2024, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.