ETV Bharat / state

मोटरमनच्या केबिनमध्ये घुसून रील शूट, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नाशिकच्या दोन रील स्टारला बेड्या - Motorman Cabin Reel Shoot

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 8:50 PM IST

Motorman Cabin Reel Shoot : मोटरमनच्या केबिनमध्ये घुसून रील शूट करणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या लोकलच्या मोटरमनच्या केबिनमध्ये ही घटना घडली.

making reels in motorman cabin
रील शूट करणाऱ्या आरोपींसह पोलीस (ETV BHARAT Reporter)

ठाणे Motorman Cabin Reel Shoot : दोन तरुणांनी मोटरमनच्या केबिनमध्ये घुसून रील बनवली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोघांचा माग काढत त्यांना अटक केली. ही घटना मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात चार नंबर फलाटावर उभ्या असलेल्या लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घडली. ही रील इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपग्रुपवर व्हायरल झाल्यानंतर रील स्टारला रेल्वे जवानांनी नाशिकमधून अटक केली आहे. राजा हिम्मत येरवाल (२०), रितेश हिरालाल जाधव (१८) अशी अटकेतील रीलस्टार आरोपींची नावे आहेत. ते दोघेही नाशिक येथील रहिवासी आहेत.

असं केलं शूट : रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा दिवसापूर्वी कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये रील बनवण्यात आली. आरोपींनी मोबाईल कॅमेऱ्यात रीलचा व्हिडीओ शूट केला. या रिलच्या व्हिडीओमध्ये ते मोटरमन असल्यासारखे तेथील यंत्रणेची हाताळणी करत होते. शिवाय लोकल सुरू करण्याचा फाजील अभिनय करून मित्रांना मागील डब्ब्यातमध्ये बसण्याचं सांगत होते. तसंच "तुम्हारा भाई अब ट्रेन चलायेगा," असं तो म्हणत होता. तर, दुसरा व्हिडिओमध्ये म्हणाले,"तुला दुचाकी चालविता येत नाही. तुला लोक काय चालविता येईल?" त्यानंतर तो मित्राच्या गालात चापट मारतो. यानंतर रील स्टारनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

दोघांना ठोकल्या बेड्या : हा व्हायरल व्हिडिओ रेल्वे सुरक्षा पथकाला मोबाईलमध्ये दिसताच त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी कसारा वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा आरपीएफचे निरीक्षक एम. के सौनी यांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्यावेळी कसारा रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही चित्रण, इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा जवानांनी या दोन्ही तरुणांची ओळख पटवली. ते नाशिक येथील रहिवासी असल्याचं समजताच त्यांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हेल्पलाईन नंबरवर करा फोन : यावेळी चौकशीत दोघांनीही मोटरमन केबिनमध्ये घुसून बेकायदा चित्रफित तयार केल्याची कबुली रेल्वे सुरक्षा जवानांना दिली. पोलिसांनी त्यांच्या दोषारोप ठेऊन त्यांना 8 ऑगस्ट रोजी अटक केली. असाच प्रकार यापूर्वी एकानं करून रेल्वे रुळाशी छेडछाड केली होती. त्यालाही अटक करण्यात आली आहे. रेल्वेच्या आवारात लोकलमध्ये कोणीही गैरकृत्य करत असेल, 139 किंवा 9004410735 वर संपर्क साधण्याचं आवाहन रेल्वं सुरक्षा जवानांनी केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.