ETV Bharat / state

ठाणे महापालिकेचं मुख्यालय झालं जीर्ण; नवीन इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची अपेक्षा - Thane Municipal Corporation

Thane Municipal Corporation Headquarter : ठाणे महानगरपालिकेचं मुख्यालय जीर्ण झालं असून नवी इमारत बांधण्यासाठी अंदाजे 727 कोटी खर्च येणार आहे. मात्र, महानगरपालिकेची तिजोरी रिकामी असल्यानं त्यांना आता राज्य सरकारच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

headquarter of Thane Municipal Corporation has become dilapidated, Expectation of state government assistance for construction of new building
ठाणे महानगरपालिका (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 11:56 AM IST

ठाणे Thane Municipal Corporation Headquarter : ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, असं असतानाही या इमारतीला गळती लागली आहे. इतकंच नाहीतर स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याची माहिती समोर आलीय. मात्र नवीन इमारतीसाठी पालिकेकडं पैसे नसल्यानं पालिका प्रशासन राज्य सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवून आहे.

ठाणे महानगरपालिकेचे मुख्यालय जीर्ण (ETV Bharat Reporter)

नव्या इमारतीसाठी 727 कोटी रुपये खर्च : ठाणे महानगरपालिका मुख्यालयाची इमारत 35 वर्षे जुनी आहे. 1989 मध्ये तयार केलेली ही इमारत चार मजली असून 3900 चौरस मीटर क्षेत्रफळावर तिचं बांधकाम करण्यात आलंय. नव्या महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी 727 कोटी रुपये खर्च येणार असून यासाठी मंजुरीही मिळालेली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून अडीचशे कोटी रुपये मिळणार आहे. मात्र, तरी देखील जवळपास 500 कोटींचा खर्च महानगरपालिकेला करावा लागणार आहे. पण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं नवीन इमारत कधी तयार होईल, असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय.

कशी असणार नवीन इमारत? : ठाण्यातील रेमंड कंपनीच्या आरक्षित भूखंडावर नवीन इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 24 जुलै 2023 रोजी शासन निर्णय देखील करण्यात आला. ज्यामध्ये अडीचशे कोटी रुपयांची कर्जाची मंजुरी राज्य सरकारनं दिलेली आहे. नवीन इमारतीमध्ये जवळपास 71044 चौरस मीटर क्षेत्रात प्रशासकीय भवन बांधण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या इमारतीमध्ये 36 हजार चौरस मीटर क्षेत्रात वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी दिली.

हेही वाचा -

  1. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अजब कारभार; उत्पन्न 100 कोटी अन् खर्च 250 कोटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.