ETV Bharat / state

मोदींवर नारेबाजेचं पुस्तक काढलं पाहिजे, नारे देण्याची भाजपाची लायकी नाही: संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल - Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षानं लोकसभेचं तिकीट नाकारल्यानंतर जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे शिवसेनेची जळगावात ताकद वाढेल आणि खासदारही शिवसनेनेचाच होईल असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Loksabha Election 2024
संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 1:20 PM IST

मुंबई - Loksabha Election 2024 : भाजपाचे खासदार उन्मेश पाटलांचा हे आज (बुधवारी) ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पार्टीनं लोकसभेचं तिकिट नाकारल्यानंतर पाटील यांचा शिवसेना पक्षप्रवेश होत आहे. उन्मेश पाटील यांना तिकिट देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. मात्र जळगावत शिवसेनेची ताकद एकत्र दिसेल. जळगावात शिवसेनेचा पहिला खासदार दिसेल, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली. तसेच यावेळी संजय राऊतांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींची आश्वासनं आणि नारेबाजीवरुन जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, देशात सगळीकडे भाजपा नारे देत आहे... नारेबाजी करत आहे. मात्र, भाजप नारे देण्याच्या लायकीचं नाही. मोदी हे देशभर नारे देताहेत... अखंड हिंदुस्थान करु... पाकव्याप्त काश्मीरला हिंदुस्थानात आणू, चीनला धडा शिकवू अशी आश्वासनं देताहेत, मात्र त्या आश्वासनाचं आणि नाऱ्यांचं काय झालं? किती आश्वासनं मोदींनी पूर्ण केली, हे देश बघत आहे. मोदींवर नाऱ्यांचे पुस्तक काढले पाहिजे, असा टोला खासदार संजय राऊतांनी मोदींना लगावला. गर्जना आणि नारे यात फरत आहे. शिवसेनेच्या आमच्या डरकाळ्या आहेत. भाजपावाल्यांचे नारे आहेत. मात्र, आता त्यांच्या नाऱ्यांना कोण महत्त्व देणार नाहीय, असं राऊत म्हणाले.

ईडी, सीबीआय ही भाजपाची मूळं...

ईडी, सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणा ही भाजपाची मूळं आहेत. आता ही मूळं जमिनीतून उपटून पडणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा हा महावृक्षच आता उन्मळून पडल्याचं निवडणुकीत तुम्हाला दिसेल, असं यावेळी संजय राऊत म्हणाले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर फक्त विरोधकांवर केला जात आहे. त्यामुळे भाजपाची मूळंही लवकरच उपटून पडतील, असं राऊत म्हणाले. दरम्यान, साताऱ्याची जागा काँग्रेसला जाणार आहे आणि तिथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे असा प्रश्न राऊतना विचारला असता, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडे आहे. मात्र यावर काही चर्चा झाली असेल तर मला माहित नाही, असं राऊत म्हणाले.

मोदी भ्रष्टाचारांना वाचवताहेत...

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'मोदी खाऊंगा ना खाने दूंगा', असं म्हणतात. 'मै भ्रष्टाचारी लोगोंको को छोडूंगा नही', असं रॅलीत म्हणताहेत. पण नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना वाचवत आहेत, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. इंडिया आघाडीचे उलटे आहे, आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहोत आणि मोदी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताहेत. आता दिल्लीतील संजय सिंग यांना न्यायालयाने जामीन मंजूर करत, सरकारवरच ताशेरे ओढले आहेत. संजय सिंग यांची अटक ही बेकायदेशीर होती. ईडीचा वापर करून विरोधकांवर कारवाई केली जात आहे, असं न्यायालयानं म्हणत सरकारवर ताशेरे ओढलेत, अशी टीका राऊतांनी केंद्र सरकारवर केली.

आम्हाला हाच सामना पाहिजे...

रत्नागिरी- सिंधूदुर्ग मतदार संघातून भाजपाकडून नारायण राणे निवडणूक लढवत आहेत, असा प्रश्न राऊतांना विचारला असता, आम्हाला हाच सामना पाहिजे होता... आम्ही याच सामन्याची वाट बघत होतो, असं राऊत म्हणाले. कारण रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत हे विक्रमी मताधिक्यानी विजयी होऊन शिवसेनेचा खासदार होण्याची परंपरा कायम ठेवतील, यात आम्हाला शंका नाहीय आणि तिथले कोकणी जनता आणि शिवसैनिक हे शिवसेनेच्या उमेदवारालाच नक्की विजय करतील, असा आम्हाला विश्वास असल्याचंही राऊतांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, तुमचे 8 आमदार आमच्या संपर्कात आहेत असं उदय सामंत म्हणाले. यावर 8 नाही 80 आमदार म्हणा... 80 आमदार त्यांच्या संपर्कात आहे म्हणा. आधी तुमच्या घरातील भाऊ यांना सांभाळा, असा टोला राऊतांनी उदय सामंतांना लगावला.

10 वर्षात देश रसातळाला...

मागील दहा वर्षात देश रसातळाला गेला आहे, प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार सुरु आहे. विविध क्षेत्रातील हालत बघा काय झालेली आहे. राहुल गांधी जे बोलताहेत ते काही चुकीचं नाही. देश रसातळाला जाईल, नाहीतर तो मागील दहा वर्षात रसातळाला गेलेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली. चीनने अरुणाचल प्रदेशमधील काही भागाचे नावं बदलली आहेत, यावर मोदी चकार शब्द काढत नाहीत. मणिपूर, लडाख, कश्मीरी पंडित आणि अरुणाचल प्रदेश याच्यावर मोदी काही बोलत नाहीत. मात्र विरोधकांवर टीका करताना दिसताहेत, असा टोला संजय राऊत यांनी मोदींना लगावला. दहा वर्षात मोदींचा चेहरा बघून लोकांना कंटाळा आला आहे. आता मोदींचा चेहरा समोर आला की लोकं घाबरत आहेत. त्यामुळे आता देशात लोकांना मोदी नको आहेत. भ्रष्टाचाराबाबत आम्ही सगळेजण लढत आहोत आणि लढणार आहोत. परंतु 'जो डर गया... समजो वो मर गया' असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा -

भाजपाच्या 'या' विद्यमान खासदारांचा ठाकरे गटात प्रवेश?; खासदारकीचं तिकीट कापल्यानं नाराज - LOK SABHA ELECTIONS

संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी जॉनी लिव्हर तर राम कदम म्हणाले उद्धव ठाकरे असरानी का? - Sanjay Raut criticizes PM Modi

'संजय, कितना झूठ बोलोगे?'; प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करून राऊतांवर हल्लाबोल - Prakash Ambedkar On Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.