ETV Bharat / state

ठाण्यात तेलुगु समाजासाठी कम्युनिटी अँड कल्चर सेंटर बांधणार, प्रताप सरनाईकांचं आश्वासन - Telugu Community and Culture Center

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 10:52 PM IST

Telugu Associations Get Together : ठाण्याच्या डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात फेडरेशन ऑफ तेलुगु असोसिएशनचा मेळावा संपन्न झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात लवकरच कम्युनिटी आणि कल्चर सेंटर बांधण्याचं आश्वासन दिलंय.

Telugu Community and Culture Center to be created for Telugu community in Thane said Pratap Sarnaik
प्रताप सरनाईक (ETV Bharat Reporter)

ठाणे Telugu Associations Get Together : आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा राज्यातील पन्नास हजार नागरिक ठाण्यात राहतात. मात्र तेलुगु समुदायासाठी एकही सामुदायिक संस्कृती केंद्र नसल्याची खंत जगन बाबू गनजी यांनी व्यक्त केली. ते डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात फेडरेशन ऑफ तेलुगु असोसिएशनच्या मेळाव्यात बोलत होते. रविवारी (25 ऑगस्ट) सकाळी तेलुगु समुदायाचा हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला ठाण्यातील तेलुगु समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांसह आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यातील मंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात लवकरच कम्युनिटी आणि कल्चर सेंटर बांधण्याचं आश्वासन दिलं. तसंच तेलुगु समाजाच्या कम्युनिटी आणि कल्चर सेंटरला भूखंड देऊन लवकरच त्याचं काम सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं.

तेलुगु समाजाचे अध्यक्ष जगन बाबू गनजी यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

फेडरेशन ऑफ तेलुगु असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात तेलुगु समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेश राज्याचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री कंडूला दुर्गेश, तेलुगु समाजाचे प्रमुख कार्यकर्ते जोनुविठूला रामा लिंगेश्वर राव, अर्थविषयक लेखक श्रीराम चेकुरी आणि आंध्र प्रदेश, हैदराबाद आणि तेलंगाणा या तीन राज्यात प्रवर्तक म्हणून काम करणारे धरम गुरुवा रेड्डी, हैदराबाद आर सोसायटीचे अध्यक्ष पीएम रामांन्ना रेड्डी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

जय तेलुगू, जय मराठीच्या घोषणा : तेलुगु समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यामध्ये तेलुगु समाजाच्या समुदाय आणि सांस्कृतिक केंद्रासाठी (Community and Culture Center) 3000 चौरस फुटांचा भूखंड दिला जाईल, असं आश्वासन दिलं. तसंच येत्या आर्थिक वर्षात सामुदायिक आणि संस्कृती केंद्राचं काम सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले. त्याचवेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं. तर स्थानिक नगरसेविका स्नेहल आंब्रे यांनी तेलुगु समाजाला मदत करण्याचं आश्वासन दिलं. या मेळाव्यात उपस्थित तेलुगु समाजाच्या वतीनं जय तेलुगु, जय मराठी, तेलुगू आई, मराठी मावशी, अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, या कार्यक्रमात तेलुगु समाजाचे अध्यक्ष जगन बाबू गनजी, अध्यक्ष डॉ. आनंद नीलायम, प्रकल्प संचालक श्री देवी गुप्ता, अशोक कंटे, सुभाष मागचा, यश व्ही.आर मूर्ती, अनुराधा शर्मिला, राघवा राव, डॉ. ऐश्वर्या, डॉ. स्नेहा किरण आणि इतर सदस्य उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.