ETV Bharat / state

मरिन ड्राइव्हवर चाहत्यांची गर्दी : भारतीय संघाच्या विजय परेडसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था - TEAM INDIA VICTORY PARADE IN MUMBAI - TEAM INDIA VICTORY PARADE IN MUMBAI

Team India Victory Parade in Mumbai: T20 विश्वचषकाच्या विजयानंतर टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहे. थोड्यावेळापूर्वीच भारतीय संघ मुंबई विमनतळावर दाखल झाला आहे. संघातील प्रत्येक खेळाडूचं स्वागत करण्यासाठी नरिमन पॉइंट, वानखेडे, मरीन ड्राइव्ह परिसर क्रिकेट चाहत्यांनी गजबजला आहे.

Team India Victory Parade in Mumbai
मरिन ड्राइव्हवर चाहत्यांची गर्दी (ETV BHARAT Repoprter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 6:45 PM IST

Updated : Jul 4, 2024, 7:01 PM IST

मुंबई Team India Victory Parade in Mumba : T20 विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला. सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं दिल्लीत जंगी स्वागत केलं. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ एका विशेष विमानानं मुंबईत दाखल झालाय. नरिमन पॉइंट, वानखेडे ते मरीन ड्राइव्ह हा परिसर क्रिकेट चाहत्यांनी गजबजलेला आहे. आपल्या लाडक्या भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूची आपल्या मोबाईल फोनवर प्रतिमा टिपण्यासाठी क्रिकेट प्रेमींची अलोट गर्दी दिसून येत आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंची प्रतीक्षा : टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू बाहेर पडण्याची चाहते वाट पाहत आहेत. लवकरच विश्वचषक ट्रॉफीसह संघाची मिरवणूक निघणार आहे. हा क्षण आपल्या मोबाईल फोन, कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी असंख्य क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे.

मरिन ड्राईव्हवर चाहत्यांच्या घोषणा : मुंबईतील मरिन ड्राईव्हवर मोठ्या संख्येनं चाहते भारतीय संघाची वाट पाहत आहेत. यावेळी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून लोक संघाच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत.

मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी : मुंबईतील मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. हे सर्व चाहते टी-20 विश्वचषक विजेत्या संघाची वाट पाहत आहेत. व्हिडिओमध्ये मरीन ड्राइव्हवर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

विमानतळाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी : मुंबई विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली असून ते सर्वजण आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसून आलं. भारतीय संघाची थोड्याच वेळात विजयी मिरवणूक निघेल. याबाबत मुंबईतील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

विजय परेडसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था : गुरुवारी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या रोड शोसाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येनं गर्दी केलीय.

हे वचालंत का :

  1. टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, रोहित आणि द्रविडनं दिली ट्रॉफी - indian Cricket team welcome
  2. विजयी क्रिकेट टीमचं मुंबईत भव्य स्वागत - Cricket victory parade
  3. विश्वविजेत्या टीम इंडियाच्या 4 मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार व्हावा, आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी - MLA Pratap Sarnaik

Last Updated : Jul 4, 2024, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.