मुंबई Tata Mumbai Marathon 2024 : 'मुंबई टाटा मॅरेथॉन स्पर्धा' ही वीस वर्षांपासून मुंबईचा रस्त्यांवर घेतली जात आहे. अतिशय उत्साही वातावरणात ही स्पर्धा पार पडते. यंदा या स्पर्धेमध्ये 60000 स्पर्धक भाग घेण्याची शक्यता आहे. सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक प्रेक्षक यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमुळं भारतीय खेळाडूंच्या उत्साहात आणि चैतन्यात नेहमीच भर पडली आहे. एकूणच मुंबईचं आरोग्य आणि एकात्मता अबाधित राखण्यात या स्पर्धेचा महत्त्वाचा वाटा असल्याचं, टाटा सन्स कंपनीचे ब्रँड आणि मार्केटिंग हेड अड्रिन टेरेन यांनी सांगितलं.
मुंबईच्या उत्साहाचे प्रतीक : मुंबईत ताज हॉटेलवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात त्यावेळी रतन टाटा यांनी काढलेले उद्गार खूपच प्रेरणादायी होते. "तुम्ही आम्हाला जखमी करू शकता पण संपवू शकत नाही, हीच ऊर्जा आणि हेच प्रेरणा मुंबईकरांच्या जीवनात आहे". मुंबईचा रस्त्यांवर धावणारे धावपटू हे याच ऊर्जेने धावत असतात, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ दिली.
कशी असेल स्पर्धा? : टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांची आरोग्य तपासणी केली जाते. स्पर्धकांना नव्वद दिवस अगोदरच शारीरिक तपासणीला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत सेलिब्रिटी, दिव्यांग, तसेच विविध स्तरातील स्पर्धकांना भाग घेता येणार आहे. या स्पर्धेला सहकार्य करण्यासाठी 2000 पेक्षा अधिक व्यक्ती आणि संस्थांनी मदत केली आहे.
काय आहे स्पर्धेची वर्गवारी? : मॅरेथॉन स्पर्धेतील मुख्य असलेल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेसाठी स्पर्धकांना 14 ऑगस्ट पासून 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर अर्ध मॅराथॉन स्पर्धेसाठी स्पर्धकांना 23 ऑगस्ट 2024 पासून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेत दहा किलोमीटर लांबीच्या विशेष राखीव चारिटी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, असून यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सहभागी करून घेतलं जाणार आहे. यासाठी खुली बॅलेट असणार आहे. 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान यासाठी नोंदणी होणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग स्पर्धकांसाठी मॅरेथॉन : चॅरिटी रनिंग स्पॉट्स या मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान अर्ध मॅरेथॉन तसंच ड्रीम रन मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. याची नोंदणी 14 ऑगस्ट ते 13 डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. ड्रीम रन, भीमराव मॅरेथॉन स्पर्धेसाठी 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग स्पर्धकांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असून यासाठी 27 ऑगस्ट ते 25 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
अर्ध मॅरेथॉनसाठी नोंदणी : टाटा मुंबई मॅरेथॉन वर्चुअल रन या स्पर्धेसाठी, जगभरात कोणतेही स्पर्धक 'टाटा मुंबई ॲप'च्याद्वारे अर्ध मॅरेथॉन दहा किलोमीटर आणि ड्रीम रनमध्ये सहभाग घेऊ शकतात. यासाठीची नोंदणी 14 ऑगस्टपासून 8 जानेवारी 2025 पर्यंत करता येणार आहे.
हेही वाचा -