नागपूर Pench Tiger Reserve : जखमी T-53 वाघाला उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे. सुमारे सव्वा महिना जखमी T-53 वाघावर गोरेवाडा येथील बचाव केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर या वाघाला महाराष्ट्राच्या हद्दीतील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पिपरीया वनपरिक्षेत्रामध्ये मुक्त करण्यात आलं आहे.
T-53 वाघ गंभीर जखमी : 17 मे रोजी नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार बीटच्या वनखंड क्र. 509 मध्ये एका जखमी वाघाबद्दल माहिती मिळाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, डॉ. निखिल बांगर यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देत वाघाची पाहणी केली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर T-53 वाघ गंभीर जखमी असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. जखमी झालेल्या वाघाला तातडीनं उपचारांची आवश्यकता होती. म्हणूनच, त्या वाघाला प्रचलित मानक पध्दतीनं पकडण्यात आलं. त्यानंतर नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात उपचारासाठी वाघाला पाठविण्यात आलं होतं.
वाघाची उपचारानंतर मुक्तता : सद्यास्थितीमध्ये वाघ T-53 हा पुर्णपणे बरा झाला आहे. संबंधित पशुवैद्यकांच्या अहवालानुसार वाघ नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी योग्य आहे. त्याचे निसर्ग मुक्त करण्याचं स्थळ हे त्याला पकडण्यात आलेल्या स्थळाजवळच आहे. वाघ T- 53 नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कार्यवाही पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल, सहायक वनसंरक्षक, पुजा लिंबगावकर, पेंच व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर, अभिजित इलमकर, डॉ. निखिल बांगर पशुवैद्यक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
'हे' वाचलंत का :
- विधान परिषद निवडणुकीत मविआला आणि महायुतीला मिळणार किती जागा? - Vidhan Parishad Election
- पुणे ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण नको; सरकारचं विरोधकांना आवाहन, सीबील स्कोर प्रकरणीही बँकांना दिला इशारा - Devendra Fadnavis on CIBIL Score
- राज्याच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी आमदारांना लागेल लॉटरी; समाजातील सर्व घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न - Mahayuti MLA Budget Demand