ETV Bharat / state

विश्वचषक अन् सूर्यकुमार यादवचा अफलातून 'झेल'; गणपतीसमोर साकारला अनोखा देखावा - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024 : सध्या देशात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. भाविक गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतायेत. भाविकांची मोठी गर्दी सार्वजनिक गणेश मंडळांसमोर होत आहे. यावेळी काही घरगुती गणपतीही लक्षवेधक ठरत आहेत. त्यातचं कोल्हापुरातील तरुणानं विश्वचषकावर आधारित एक अनोखा देखावा गणपतीसमोर केलाय.

Ganeshotsav 2024
घरगुती गणपती सजावटीत साकारला विश्वचषकातील देखावा (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 9:43 PM IST

Updated : Sep 9, 2024, 10:13 PM IST

कोल्हापूर Ganeshotsav 2024 : तब्बल 17 वर्षांचा विश्वचषक स्पर्धेतील अजिंक्यपद मिळवण्याचा दुष्काळ संपवून यंदाच्या वर्षी 29 जूनला भारतीय क्रिकेट संघानं टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधील सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) अफलातून झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. सूर्यकुमारच्या या झेलचा आणि कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक स्वीकारतानाचा कल्पक देखावा कोल्हापुरातील तरुणानं हुबेहूब साकारला. किरण पाटील असं या क्रिकेट प्रेमी तरुणाचं नाव आहे.

घरगुती गणपती सजावटीत साकारला अफलातून देखावा (ETV BHARAT Reporter)

झेल घेतानाची केली कल्पक सजावट : उत्तर अमेरिकेतील बार्बाडोस येथे 29 जूनला झालेल्या यंदाच्या टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना कोणताही भारतीय विसरू शकत नाही. भारतीय संघानं दिलेल्या 176 धावांचा पाटलाग करताना दक्षिण आफ्रिकेची अवस्था दयनीय झाली होती. मात्र, आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या जोडीनं दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं होतं. मात्र, शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असताना डेव्हिड मिलरनं फटकावलेला चेंडू अफलातून क्षेत्ररक्षण करत भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सुर्यकुमार यादवनं टिपला आणि या सामन्याचा नूरच पालटला. हा झेल घेतानाची कल्पक सजावट कोल्हापुरातील करवीर तालुक्यात असणाऱ्या आडूर येथील किरण पाटील आणि त्याचा मित्र अमोल भाकरे यांनी आपल्या घरात गणपतीसमोर साकारली.

विश्वचषकाचा देखावा : फिटिंग साहित्यातील रॉ मटेरियलपासून त्यांनी ही सजावट केली. हे दोघेही रोहित शर्माचे कट्टर समर्थक आहेत. रोहित शर्माला विश्वचषक घेताना किरण आणि अमोल यांना पाहायचं होतं. ते स्वप्न यावर्षी पूर्ण झालं. त्यामुळंच गणपती उत्सवाच्या आधी आठ दिवस या सजावटीची तयारी सुरू केली. सूर्यकुमार यादव झेल टिपताना आणि रोहित शर्माच्या हातात विश्वचषक असल्याची सजावट या मित्रांनी साकारली.

रोहित आणि सूर्यकुमारचे फॅन्स : किरण पाटील याचा भाऊ रोहित पाटील वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळतो. किरण आणि अमोल हे रोहित शर्माच्या फलंदाजीचे चाहते आहेत. मात्र, यंदाच्या टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार यादवने अफलातून झेल घेत सामन्याचा निकाल पालटला. त्यामुळं दोघेही आता सूर्यकुमारचेही कट्टर चाहते बनले. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतात परतलेल्या टीम इंडियाचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार झाला होता. यावेळी कर्णधार रोहित शर्मा हा सूर्यकुमारला उद्देशून म्हणाला होता 'त्यानं झेल सोडला असता तर मी त्याला सोडला असता'. मात्र, सूर्यकुमारनं अचूक झेल टिपल्यानेच भारत दुसऱ्यांदा 'वर्ल्ड चॅम्पियन' झाला. त्यामुळं सूर्यकुमार माझा आवडता क्रिकेटर बनला, अशी प्रतिक्रिया किरण पाटील यांनी दिली.

हेही वाचा -

  1. 'या' शुभ मुहूर्तावर गौराई येणार माहेरी; जाणून घ्या ज्येष्ठा, कनिष्ठा गौरीची कथा - Jyeshtha Gauri Avahana 2024
  2. एका छताखाली 451 गणरायांचं दर्शन; अमरावतीच्या खंडेलवाल कुटुंबाचा अनोखा उपक्रम, पाहा व्हिडिओ... - Ganeshotsav 2024
  3. शिर्डीत आता साईबाबांसह बाबा केदारनाथांचंही घेता येणार दर्शन - Shirdi Ganeshotsav 2024

Last Updated : Sep 9, 2024, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.