ETV Bharat / state

जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, भाजपानंही भरली हवा - Jayant Patil Congress Joins

Suraj Chavan Claims : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे, असं भाकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी वर्तविलं आहे.

Suraj Chavan Claims
जयंत पाटील (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 6:29 PM IST

मुंबई Suraj Chavan Claims : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक दिग्गजांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला. त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेटीची वेळ मागितली असल्याचा खळबळजनक दावा देखील केला आहे.

सुरज चव्हाण हे जयंत पाटील यांच्याविषयी मत मांडताना (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले सुरज चव्हाण? : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लोकसभा निवडणुकीच्या निर्णयानंतर अर्थात चार जून नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता सुरज चव्हाण यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेटीची वेळ देखील मागितली असून त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त देखील ठरला असल्याचा असल्याचा खळबळजनक दावा सुरज चव्हाण यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जून रोजी वार्तापन दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यासोबत अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते देखील पक्षप्रवेश करतील, अशी माहिती सुरज चव्हाण यांनी दिली आहे. 4 जून नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्णपणे रिकामा होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर? : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या दाव्यात भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील हवा भरण्याचं काम केलं आहे. दरेकर म्हणाले की, यापूर्वीच जयंत पाटील यांनी भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील अशा प्रकारचे चित्र होतं. सुरज चव्हाण यांच्या बोलण्याला अर्थ असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे भविष्य त्यांना माहीत असल्यामुळे तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, असं भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस विचाराचे लोक परत येत आहे - नाना पटोले : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे चार जून नंतर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. देशभरातील जे लोक काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आहेत ते नेते पुन्हा काँग्रेस पक्षाकडे येण्यास सुरुवात झाली आहे. जयंत पाटील जर आपल्या पक्षात आले तर आपण त्यांना घेणार का या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, देशात परिवर्तनाची लाट सुरू असून याबाबत काँग्रेस हाय कमांड जेव्हा यावर निर्णय घेतील, त्या निर्णयाचे आम्ही समर्थन करू असं म्हणत संकेत दिले आहे.

भाजपात विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही - महेश तपासे : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लोकसभा निवडणुकीसाठी उभी असलेले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीच जागा धोक्यात असून ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत. आमच्या पक्षाची चिंता करू नये. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विषयी वावड्या उठवणे ही भाजपाचे रणनीती आहे. लोकसभा निवडणुकीच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्यामुळे अशा प्रकारचे दावे केले जात आहे. आमच्या पक्षाला सोडून गेलेले आमदार 4 जून नंतर शरद पवार यांच्याकडे परत येणार आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपात विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही. आमच्या पक्षाची चिंता करू नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता महेश तपासे यांनी दिला आहे.

जयंत पाटील काय बोलतात याकडे लक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर जयंत पाटील भाजपात जाणार या संदर्भातील चर्चा माध्यमातून सुरू झाल्या होत्या; मात्र स्वतः जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन आपण शरद पवार यांच्यासोबत असून त्यांची साथ सोडणार नसल्याचं म्हणत सर्व बातम्यांचं खंडन केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांचा काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा केला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. सुनील टिंगरे यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे; पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून पाठराखण - Pune Porsche Accident
  2. मेगा ब्लॉकचा फटका मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना, कोणत्या परीक्षा झाल्या रद्द, जाणून घ्या - Mumbai Mega Block Effect
  3. सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट; बिश्नोई गँगच्या 4 शूटर्संना अटक, हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र - Salman Khan Firing Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.