ETV Bharat / state

कुठून येते इतकी क्रूरता ? घड्याळ चोरल्याच्या संशयातून विद्यार्थ्याला अर्धनग्न करुन बेदम मारहाण

Student Brutally Beaten : छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका विद्यार्थ्याला घड्याळ चोरल्याच्या संशयातून मदरशात बेदम मारहाण करण्यात आलीय. या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलाय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 11:03 AM IST

मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक

छत्रपती संभाजीनगर Student Brutally Beaten : चोरी केल्याच्या संशयातून मदरशामध्ये एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटना खुलताबाद येथील मदरशामध्ये घडली असून याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.

घड्याळ चोरल्याचा आरोप करत मारहाण : खुलताबादमधील मदरशात एक धक्कादायक घटना समोर आलीय. दुकानातील घड्याळ चोरल्याचा आरोप करत एका विद्यार्थ्याला मदरशामध्ये बेदम मारहाण करण्यात आली. सदरील घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली असून त्याचा व्हिडिओ 29 फेब्रुवारी रोजी समोर आला. हा विद्यार्थी गुजरातमधील सूरत येथील रहिवासी असून त्याला त्याच्या पालकांनी जामिया कादरिया उलूम अरबी शाळा म्हणजेच मदरशात शिक्षणासाठी पाठवलं. चार फेब्रुवारी रोजी त्याच्या हातात घड्याळ पाहून तिथं शिकवणारे शिक्षक मौलाना सय्यद उमेद आणि मौलाना नाजेर यांना त्यानं हे चोरल्याचा संशय आला. त्यांनी त्या विद्यार्थ्याला अर्धनग्न करत बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर इतर विद्यार्थ्यांनी देखील त्याला मारायला सांगितलं. त्यावरुन इतर विद्यार्थ्यांनी त्याच्या पाठीवर मारहाण केली. सदरील घटनेचा मुलांनी काढलेला व्हिडिओ 29 फेब्रुवारी रोजी समोर आल्यावर सर्वत्र खळबळ उडाली.

वडिलांनी दिली तक्रार : ही घटना घडल्यावर विद्यार्थ्यांच्या वडिलांना याची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी गुजरात येथून छत्रपती संभाजीनगर गाठत खुलताबाद पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदवली. सदरील व्हिडिओचा आधार घेत पोलिसांनी याप्रकरणी मौलानांवर कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर दोन्हीही मौलाना फरार झाले आहेत. याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत असून खुलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख जाकीर पुढील तपास करत आहे. "याबाबत अल्पवयीन आरोपी यांच्याशी संवाद साधून समुपदेशन केलं जात आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.

हेही वाचा :

  1. मराठा समाज पुन्हा आक्रमक, जळगाव रोडवर जागोजागी केला रस्ता रोको
  2. शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.