ETV Bharat / state

क्रीडा शिक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, साताऱ्यातील फलटण तालुक्यातील घटना - अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. शाळेतील क्रीडा शिक्षकानं दहावी आणि अकरावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय.

Satara Crime News
Satara Crime News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 3:42 PM IST

सातारा Satara Crime News : साताऱ्यातील फलटण तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय. दहावी आणि अकरावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील क्रीडा शिक्षकानं अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. यामुळं फलटण तालुक्यात संतापाची लाट उसळलीय. याप्रकरणी तुषार मोहिते या नराधम शिक्षकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा क्रीडा शिक्षक अत्याचार करुन सध्या फरार झालाय.

तक्रार अर्जाच्या चौकशीत घटना उघड : फलटण पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण तालुक्यात एकच खळबळ उडालीय. दहावीत आणि अकरावीत शिकणाऱ्या दोन मुलींवर क्रीडा शिक्षकानंच अत्याचार केल्याचं निष्पन्न झालंय. फलटण तालुक्यातील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून हा शिक्षक कार्यरत आहे.

डिसेंबर महिन्यात घडला प्रकार : खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर स्वत:च्या कारमधून पीडित मुलीला घरी सोडण्याचा बहाणा करत शिक्षकानं मुलीवर अत्याचार केला. दुसरी घटना शाळेच्या आवारातील जिममध्ये घडलीय. पीडित मुलगी व्यायामासाठी जिमच्या खोलीत गेली असताना, शिक्षकानं तिच्यावर अत्याचार केला. या दोन्ही घटना डिसेंबर 2023 मध्ये घडल्या आहेत. एका पीडित मुलीनं तिच्या मावस भावाला हा प्रकार सांगितल्यानंतर तक्रार अर्ज करण्यात आला होता. या अर्जाच्या चौकशीदरम्यान या अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी करण्यात आली. त्यामध्ये तथ्य आढळून आले. याप्रकरणी महिला पोलीस काॅन्स्टेबलनं फिर्याद दिलीय. संबंधित शिक्षक फरार झाला असून आम्ही त्याचा कसून शोध घेत आहोत. - विशाल वायकर, सहायक पोलीस निरीक्षक

महिला पोलीस काॅन्स्टेबलनं दिली फिर्याद : याप्रकरणी महिला पोलीस काॅन्स्टेबलनं फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. फिर्यादीवरुन शिक्षकाविरोधात 'पोक्सो' कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून संबंधित शिक्षक फरार झालाय. फलटण ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा, तुझं करिअर बनवेन' म्हणत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; निवासी शाळेच्या संचालकाला अटक
  2. पोटच्या पोरीची आई-वडिलांनी केली हत्या, 'हे' धक्कादायक कारण आलं समोर
  3. लग्नाच्या बहाण्यानं आर्थिक सल्लागारावर बलात्कार; 'सीए'ला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.