ETV Bharat / state

फिल्मी स्टाईल थरार: मुलानं कारनं पाठलाग करत वडिलाच्या गाडीला मारली धडक, 5 जण गंभीर जखमी - Son Hit Fathers Car - SON HIT FATHERS CAR

Son Hit Fathers Car : घरगुती भांडणातून मुलानं वडिलाच्या कारला जोरदार धडक दिल्यानं 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुलानं कारनं धडक देताना रोडवर आलेले दुचाकीस्वारही या अपघातात सापडले आहेत. या प्रकरणी वडिलाच्या तक्रारीवरुन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Son Hit Fathers Car
अपघातग्रस्त कार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 1:50 PM IST

Updated : Aug 21, 2024, 9:17 PM IST

ठाणे Son Hit Fathers Car : घरगुती वादातून 38 वर्षीय मुलानं फिल्मी स्टाईलनं कार चालवत वडिलाच्या कारचा पाठलाग करत जोरदार धडक दिल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात मधात आलेले 5 जण गंभीर जखमी झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बदलापूर - अंबरनाथ मार्गावरील चिखलोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल समोर घडली आहे. यप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वडील बिंदेश्वर शर्मा (वय 62, रा. कुलाबा मुंबई ) यांच्या तक्रारीवरुन मुलगा सतीश शर्मा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

कारच्या अपघाताचा व्हायरल व्हिडिओ (Source- social media)

मुलानं पाठलाग करत वडिलाच्या गाडीला मारली धडक : पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता बिंदेश्वर शर्मा आणि त्यांचा मुलगा सतीश हे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरुन वेगवेगळ्या कारनं जात होते. बिंदेश्वर आणि कुटुंब एका पांढऱ्या फॉर्च्युनरमध्ये होता, तर काळ्या टाटा सफारीत आरोपी मुलगा सतीश त्यांच्या मागं जात होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येते की, अंबरनाथच्या दिशेनं टाटा सफारी कार चालली होती. त्यावेळी घटनास्थळी काही करणावरुन वाद होऊन दोन्ही कार थांबल्या. यावेळी त्या ठिकाणी थांबलेल्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र आरोपी सतीशनं आधी त्याच्या वडिलांच्या कारला मागून धडक दिली.

कारच्या बोनेटवर नेलं तरुणाला फरफटत : सतीश त्यानंतर पुढं वळवला आणि हॉटेलच्या समोर थांबलेल्या कार पुढं येण्याआधी तो परत आला. वडिलाच्या कारला जोरदार धडक दिल्यानंतर, जेव्हा कार चालकानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं दार उघडलं. यावेळी त्यानं त्याच्याजवळ बसलेल्या एका अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत केली. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या नागरिकांना त्याच्या कारची धडक झाली. यूटर्न मारताना एक व्यक्ती सतीशच्या कारच्या बोनेटवर खाली पडून रस्त्यावर कोसळला. एवढ्यावर आरोपी सतीश थांबला नाही, तर त्यानं त्याच्या वडिलांच्या कारला धडक देण्यासाठी यू-टर्न घेतला तेव्हा, त्याला 50 फूट कारनं ढकलत गेला. या अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले.

वैवाहिक कलह मिटवण्यासाठी आले होते अंबरनाथला : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सफारी चालवणारा चालक हा तक्रारदार यांचा मुलगा असून त्याची पत्नी आणि त्याच्यात वैवाहिक कलह असल्याचा संशय आहे. तक्रारदार यांना दोन मुलं असून ते संरक्षण खात्यातून निवृत्त झाले आहेत. घटनेच्या दिवशी ते पत्नी आणि दुसऱ्या मुलासोबत मुंबईतून बदलापूरला जात होते. दुसरा मुलगा आणि त्याची पत्नी यांच्यातील वाद मिटवण्यासाठी वडील, आई आणि त्यांचा दुसरा मुलगा मुंबईहून बदलापूरला आले होते. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेची नोंद अंबरनाथ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा करुन जखमींना उपचारसाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. मात्र घटनेच्या काही मिनिटातच या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा व्हायरल झाला, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

(Disclaimer- ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही अथवा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

  1. कुठे पोलीस तर कुठे पती-पत्नी; राज्यात दोन दिवसांत तीन 'हिट अँड रन'च्या घटना, चार जणांचा बळी - Hit and Run Accident
  2. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, मृत महिलेच्या पतीची मागणी; आरोपीनं मद्यप्राशन केल्याचा संशय - Worli Hit And Run Case

Last Updated : Aug 21, 2024, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.