ETV Bharat / state

पुण्यात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस; व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्र काढत दिला 'हा' संदेश... - Jagtik Amli Padarth Divas

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 11:02 PM IST

Jagtik Amli Padarth Divas : ‘ड्रग्ज’ घेणं तरुणाईमध्ये आजकाल ट्रेंड बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्र काढत 'जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस' पाळून संदेश साजरा केला.

Jagtik Amli Padarth Divas
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस (ETV BHARAT Reporter)

पुणे Jagtik Amli Padarth Divas : शिक्षणाची राजधानी तसंच सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख आहे. आता ती ओळख हळुहळू कमी होत चाललीय आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण म्हणजे गेल्या वर्षभरात पुण्यात 'ड्रग्ज' संदर्भात घडत असलेल्या घटना आहे. अश्यातच आज 'जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना'चं औचित्य साधून पुण्यातील ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी पुण्यातील संभाजी उद्यान बाहेर अंमली पदार्थ विरोधी व्यंगचित्र काढत जनजागृती केली.

व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्र काढत दिला हा संदेश (ETV BHARAT Reporter)

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं जनजागृती मोहीम : पुणे शहरात सातत्यानं पब आणि ड्रग्सबाबत घडत असलेल्या घटना पाहता तरुण पिढीला ड्रग्स आणि अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून संभाजी पार्क बाहेर चारुहास पंडित, बैजनाथ दुलंगे, घनश्याम देशमुख, धनराज गरड अश्या व्यंगचित्रकारांनी 'पुणेकरांनो, एकत्र येऊन अंमली पदार्थांच्या विरोधात लढू या' असा संदेश आपल्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिला आहे.

सामाजिक संदेश : यावेळी चिंटू फेम व्यंगचित्रकार चारुदास पंडित म्हणाले की, आज ड्रग्सच्याबाबत ज्या बातम्या येत आहे. ते पाहून सामान्य नागरिक म्हणून एक भीती वाटत आहे. आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसाच्या निमित्तानं व्यंगचित्रांच्या माध्यमातून आम्ही एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. मी तर माझ्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून चिंटूद्वारे हा संदेश देत आहोत. लहानपणापासून अंमली पदार्थाबाबत मुलांमध्ये जनजागृती झाल्यास याचा फायदा हा नक्कीच होईल असं यावेळी चारुदास पंडित म्हणाले.

पुण्यात ड्रग्जच्या घटनेत वाढ : सांस्कृतिक राजधानी असलेल्या या पुणे शहरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सची प्रकरणे समोर आली आहेत. ससून रुग्णालयात ड्रग्सचा पुरवठा असेल, तसेच पुणे पोलिसांकडून जवळपास 1600 किलो ड्रॅग्स कारवाई असेल, तसेच पुण्यातील पब आणि बारमध्ये तरुण तरुणींकडून ड्रग्स घेणं असेल, अश्या घटना घडल्यानं पुणे शहराची जी ओळख आहे ती बदलत चाललीय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा -

  1. मानवी तस्करीत तेलंगणाचा देशात पहिला क्रमांक, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक? - Day against Drug Abuse
  2. पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये खुलेआम ड्रग्ज विक्री; अल्पवयीन मुलांनी सेवन केल्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासन खडबडून जागं - Drugs Selling FC Road Pune
  3. एनसीबी मुंबईनं आंतरराज्यीय ड्रग्ज सिंडिकेटचा केला पर्दाफाश; 1 कोटींचं ड्रग्ज जप्त, एकास अटक - Narcotics Control Bureau

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.