सोलापूर Solapur Crime : शाळेत खोड्या काढत असल्यानं तसंच वारंवार मोबाईल मागितल्यानं एका बापानं आपल्या मुलाला थंड पेयातून विष पाजल्याची घटना सोलापुरात घडली आहे. या घटनेनं सोलापूर शहर हादरलं आहे. 13 जानेवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडजवळील नाल्याजवळ एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच जोडबावी पेठ पोलिसांनी मुलाला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी तपास केला असता निलेश कुमार ( नाव बदलेलं आहे, वय 14 वर्षे ) असं या मुलाचं नाव आहे. तर रमेश कुमार, असं क्रूर पित्याचं नाव आहे.
302 अन्वये गुन्हा दाखल : सायंकाळी निलेश घरातून निघून गेला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत घरापासून घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांच्या तपासात फिर्यादीच्या पतीनं म्हणजेच मृत मुलाच्या वडिलांनीच हा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे. मृत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीनं दिलेली माहिती अशी की, निलेश शाळेत, शेजाऱ्यांशी सतत खोड्या काढायचा. शाळेतील सततच्या तक्रारीमुळं रागाच्या भरात थंड पेयात विषारी पावडर मिसळून निलेशची हत्या केल्याची कबुली वडिलांनी दिली आहे. या गुन्ह्यासंदर्भात जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रागाच्या भरात वडिलांनीच मुलाचा खून केल्याची माहिती दिली आहे. तो खोडकर असल्यामुळं रोज भांडण घरी आणायचा म्हणुन त्यांची हत्या कल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलंय - अजय जगताप, पोलीस निरीक्षक
निर्दयी बापास बेड्या : जोडबावी पेठ पोलिसांना सुरुवातीपासूनच विजयवर संशय होता. विजयच्या पत्नीनं त्याची माहिती देताच पोलिसांनी तत्काळ रमेश कुमारला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली. अखेर त्यांनी मुलगा निलेशची हत्या केल्याची कबुली दिली. रमेश हा टेलरिंगचा व्यवसाय करत असून तो कुटूंबासह भवानी पेठेत राहतो. त्यानं आपल्या मुलाची हत्या कशी केली याची कबुली देताच पोलिसांचाही गोंधळ उडाला. मुलगा सतत मोबाईल पाहण्यात गुंग असायचा. कितीही समजावून सांगितले तरी त्याच्या वागण्यात बदल होत नव्हता. त्यामुळे संतापून टोकाचे पाऊल उचलले.
बापाची पोलीस कोठडीत रवानगी : मुलाच्या खोडकर स्वभावाला कंटाळून वडिलांनी मुलाची हत्या केली. निलेश हा सोलापुरातील एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. निलेश स्वभावानं खोडकर होता. 13 जानेवारी रोजी रमेश आपला मुलगा निलेशला दुचाकीवरून सोलापूर तुळजापूर रस्त्यावर घेऊन गेला. तिथं त्याला विषारी पावडरमिश्रित शीतपेयातून सोडियम नायट्रेट पाजलं. त्यामुळं निलेश बेशुद्ध पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी पेठ पोलिसांनी रमेशला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं निलेशला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी मंगळवारी दुपारी याबाबत अधिकृत माहिती दिली. 31 जानेवारीला आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
हे वाचलंत का :