पिंपरी चिंचवड (पुणे) Woman killed in OYO Hotel : Oyo हॉटेलमधील हत्येनं शहरात खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आलीय. मृत महिला उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. ऋषभ निगम (रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. पुढील चौकशी हिंजवडी पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषभ निगम हा महिलेचा प्रियकर आहे. (Pimpri Chinchwad Murder Case) त्याने शनिवारी (27 डिसेंबर) रात्री उशिरा महिलेची हत्या केली. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड : महिलेची हत्या करून ऋषभ मुंबईच्या दिशेनं फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टलसह अटक केली. महिलेचा खून का करण्यात आला? हा प्रकार रात्री नेमका किती वाजता घडला? याबाबत पोलीस तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. मृत महिला एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. ऋषभ हा मुळचा लखनौ येथील राहणारा आहे. तो पुण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत महिला आणि ऋषभ हे बरोबर होते. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात ते पहाटेच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात ऋषभने महिलेवर हल्ला करून तिची हत्या केली. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून तो पळून गेला.
प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड : महिलेची हत्या करून ऋषभ मुंबईच्या दिशेने फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टलसह अटक केली. महिलेचा खून का करण्यात आला?, हा प्रकार रात्री नेमका किती वाजता घडला?, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. संबंधित प्रकारात प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. मृत महिला एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. ऋषभ हा मुळचा लखनौ येथील राहणारा आहे. तो पुण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत महिला आणि ऋषभ हे बरोबर होते. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात ते पहाटेच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात ऋषभने महिलेवर हल्ला करून तिची हत्या केली. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून तो पळून गेला.
आरोपी आणि मृत महिला हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत. मृत महिला पुण्यातील एका नामांकित कंपनीत इंजिनिअर आहे. 25 जानेवारीला त्यांचं संबंधित हॉटेलमध्ये रजिस्ट्रेशन होतं. त्यामुळं 25 तारखेपासूनच ते हॉटेलमध्ये सोबत राहत होते. पुढील तपास सुरू आहे - विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस
हत्या करून ऋषभ मुंबईकडे निघाला : सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ हा महिलेला भेटायला पुण्यात आला होता. त्यानंतर काल रात्री दोघे हिंजवडी परिसरातील ओयो हॉटेलमध्ये एका खोलीत थांबले. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला आणि ऋषभने महिलेची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो मुंबईच्या दिशेने फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याला रात्रगस्ती दरम्यान अटक केली आणि हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केले. वृषभ आणि महिलेमध्ये नेमका काय वाद झाला होता आणि त्याने पिस्तूल कुठून आणले होते? या संदर्भात पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
हेही वाचा: