अहमदनगर Anna Hazare : लोकपाल विधेयक अस्तित्वात आणण्यासाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांनी २०११ मध्ये साथ दिली होती. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये असलेले मतभेद समोर आले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " नवीन दारू धोरणाची नीती ठरवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी कायदा केला. यावर केजरीवाल यांना मी दोनदा पत्र लिहिली. धोरण वाईट आहे की चांगला हा वेगळं मुद्दा आहे. मात्र दारू वाईट असल्यामुळे महिलावर अत्याचार वाढत आहेत. त्याच दारुमुळे खून होतात.
काय म्हणाले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात अरविंद केजरीवाल यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या आंदोलनातूनच कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल यांची देशातील नागरिकांना ओळख झाली. मात्र आता अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्यात अटक झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. "अरविंद केजरीवाल सारखा माणूस जो माझ्यासोबत आंदोलनात होता. आम्ही दारूविरोधात आंदोलन केलं. आता तोच माणूस दारू धोरण तयार करत आहे. त्याला अटक केली, ही त्याच्या कर्माची फळं तो भोगत आहे. आम्ही आंदोलन केलं नसतं, तर आज अरविंद केजरीवाल यांना अटक झाली नसती," असं अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितलं.
अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात पैसा शिरला : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, " आता त्याला अटक झाली. त्यावर ते आणि सरकार आता पाहून घेतील. कारण तो अरविंद केजरीवाल जर असता तर दुःख झालं असतं. पण आज तो अरविंद केजरीवाल संपलाय. आता त्याच्या डोक्यात पैसा शिरला आहे. त्यामुळे त्याला अटक झाल्याचं मला दुःख वाटत नाही. जे कायदे होतात, ते बरे-वाईट गोष्टींमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी कायदे केले जातात."
अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून उभं राहिलं नेतृत्व : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत लोकपाल आंदोलन केलं. या आंदोलनात जंतरमंतरवर अण्णा हजारे यांच्याबरोबर अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास आदींसह अनेकांनी सहभाग घेतला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातून उभं राहिलं. या आंदोलनानंतरच अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करत दिल्लीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत भरघोस यश संपादन करत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
हेही वाचा:
- सुनावणी सुरू होण्याच्या काही वेळाआधीच केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयातून ईडीच्या अटकेविरोधातील याचिका घेतली मागे - ED Arrested CM Kejriwal
- केजरीवाल एक विचार असल्यानं कैद करता येत नाही, पंतप्रधान घाबरतात- आप महाराष्ट्राच्या सचिवांची टीका - ED arrested CM Kejriwal
- अरविंद केजरीवाल यांना ईडूकडून अटक; 'आप' आज करणार देशभरात आंदोलन - ED Arrested Arvind Kejriwal