ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या बदलल्या भूमिका, अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंसह एकनाथ खडसेंवर साधला निशाणा - Social activist Anjali Damania

Social activist Anjali Damania : लोकसभा निवडणुका सुरू असताना एकनाथ खडसे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा भाजपात प्रवेश करत आहेत. त्यावर बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यास विरोध करणार असल्याचं सांगितलं. त्यांनी याबाबत राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याची माहिती दिली.

दमानिया
दमानिया
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 10:16 PM IST

Updated : Apr 11, 2024, 9:28 AM IST

काय म्हणाल्या अंजनी दमानिया

मुंबई : Social activist Anjali Damania : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत विरोधी पक्षातील अनेक नेते सत्ताधारी भाजपात, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत. तसंच, काही नेते महाविकास आघाडीच्या गळालादेखील लागत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे आपल्या स्वगृही परतणार आहेत. एकनाथ खडसे यांचं भाजपाकडून राज्यपालपदी पुनर्वसन केलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत. याला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार विरोध केला आहे.

खडसे यांना राज्यपाल करू नये : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, " एकनाथ खडसे यांना भाजपात घेतल्यानंतर राज्यपाल केले जाणार असल्याचं मला माध्यमातून आणि राजकीय चर्चेतून समजलं आहे. त्यानंतर मी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. त्यात एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्याबाबतीत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यामुळे त्यांना राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी विनंती आपण पत्राच्या माध्यमातून केली आहे. तसंच, हे पत्र देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना पाठवलं आहे. त्यांच्याकडून आपल्याला याबाबत काही अपेक्षा वाटत नाही, " असे दमानिया यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांचा निर्णय कोणाच्या तरी दबावाखाली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, " राज ठाकरेंची भाषण आपणदेखील ऐकत असतो. मात्र, भाषणाची सुरवात आणि त्याचा शेवट अगदी वेगळा होता. सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या कामात डॉक्टरांना घेण्यास विरोध केला. नोटाबंदी, बेरोजगारी यावर केंद्र सरकारच्या भूमिकेवर विरोध दर्शवला. त्यानंतर फक्त खंबीर नेतृत्व हवं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांना ईडीने चौकशीला बोलावलं होतं, त्याची आपल्याला आठवण झाली. राज ठाकरे कोणाच्या तरी दबावाखाली बोलत होते," असा दावा अंजली दमनिया यांनी केला आहे.

केजरीवाल जेलमध्ये तर भ्रष्टाचार करणारे सोबत : देशातील राजकारण अगदी वेगळ्या वळणावर आहे. कथित मद्य घोटाळ्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत. मी त्यांच्याबाबत स्पष्टीकरण देत नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला राज्यातले मोठे भ्रष्टाचार करणारे तुमच्यासोबत सत्तेत बसले आहे त्यांना वेगळा न्याय कसा? असा सवाल अंजली दमानिया यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला आहे.

हेही वाचा :

1 काय आहेत राज यांच्या मोदी पाठिंब्यामागील गणितं? वाचा ईटीव्हीचा खास रिपोर्ट - MNS support to Modi

2 पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मोठ्या नेत्याचा होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश, उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम - Lok Sabha Election

3 महाराष्ट्रातून महाविकास आघाडीची एकही जागा निवडून देऊ नका; नरेंद्र मोदी यांचं रामटेकच्या सभेतून आवाहन - Modi Sabha In Ramtek

Last Updated : Apr 11, 2024, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.