ETV Bharat / state

संथ गतीच्या मतदानावरून फडणवीस-ठाकरे आमनेसामने, कमी मतदानानं वाढवली धाकधूक - Low Voting Issue Mumbai - LOW VOTING ISSUE MUMBAI

Low Voting Issue Mumbai : मुंबईत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्यानं महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येही धाकधूक वाढली आहे. यावरून आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. मतदारांनी पहाटेपर्यंत मतदान करावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आता हरण्याची पार्श्वभूमी तयार करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणीस यांनी केलेला आहे.

Low Voting Issue Mumbai
देवेंद्र फडणवीस (REporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 7:26 PM IST

Updated : May 20, 2024, 7:58 PM IST

मुंबई Low Voting Issue Mumbai : मुंबईतल्या अनेक मतदान केंद्रावर अत्यंत संथ गतीनं मतदान पार पडलं. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालय. गरज भासली तर पहाटेपर्यंत मतदान करा असं उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलय. तर दुसरीकडे फडणवीस यांनी महाविकास आघाडी आता हरण्याची पार्श्वभूमी तयार करत असल्याची टीका केली आहे.

प्रशासनातील अधिकारी जबाबदार-ठाकरे : काही निवडणूक केंद्रावर जाणूनबुजून अधिकारी मतदानाला उशीर करत आहेत. मतदारांना वेळेत मतदान करता येऊ नये, यासाठी संथ गतीनं मतदान प्रक्रिया करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अशा अधिकाऱ्यांना सोडू नका, मतदारांनी पहाटेपर्यंत मतदान केलं पाहिजे असंही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचं रडगाणं सुरू-फडणवीस : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबईत संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली असल्याचं सांगत ते म्हणाले की, आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं रडगाणं सुरू केलं आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केलय. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.

मतदान करा-फडणवीस : माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. दक्षिण मध्य मुंबईत मतदान केंद्रावर घोळ; मतदारांची नावं गायब, आयोगापुढे डोकं आपटायचं का, संतप्त मतदारांचा सवाल - Lok Sabha Election 2024
  2. उद्या दुपारी 1 वाजता लागणार एचएससी बोर्डाचा बारावीचा निकाल, वाचा कुठे पाहू शकता ऑनलाईन रिझल्ट... - HSC board 12th result
  3. "मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हावी", परेश रावलची प्रतिक्रिया: दिग्गज सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क - LOK SABHA ELECTION 2024

Last Updated : May 20, 2024, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.