ETV Bharat / state

शेतकऱ्यांना बैलपोळा गिफ्ट; कोथिंबीरची जुडी तब्बल 450 रुपये तर मेथी 250 रुपये जुडी - Coriander Rs 450 per Judi - CORIANDER RS 450 PER JUDI

Coriander Rs 450 per Judi - सततचा पाऊस आणि शेतात होणारं पाणी यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक सध्या कमी होत आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याचे दर भडकण्यात झाला आहे. नाशिकमध्ये त्यामुळे कोथिंबीरीच्या जुडीला तब्बल ४५० रुपये मोजावे लागत आहेत. वाचा सविस्तर वृत्त...

कोथिंबीरची जुडी
कोथिंबीरची जुडी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 12:19 PM IST

Updated : Sep 3, 2024, 5:22 PM IST

नाशिक Coriander Rs 450 per Judi : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तसंच पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा असल्याने बाजारात कोथिंबीर पाठोपाठ मेथीची आवक देखील कमी झाली आहे. परिणामी नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीर आणि मेथीने उच्चांकी भाव गाठला. कोथिंबीर 450 तर मेथी चक्क 250 रुपये जुडी प्रमाणे विकली गेली. विक्रीला आणलेल्या कोथिंबीर आणि मेथीला रेकॉर्ड ब्रेक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळालं.

ऐतिहासिक विक्रमी भाव - नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतातील उभं पीक खराब झालं आहे. त्यातच बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या असल्याने बाजारात केवळ पंधरा टक्के शेतीमाल आला परिणामी कोथिंबीर आणि मेथीला ऐतिहासिक विक्रमी भाव मिळाला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी लिलावात चांदवड तालुक्यातील शिंदेगाव येथील शेतकरी भिका ठोंबरे यांच्या कोथिंबीरला 45 हजार शेकडा तर सिन्नर तालुक्यातील जातील गावातील शेतकरी मच्छिंद्र शेळके यांच्या मेथीला 24 हजार शेकडा असा विक्रमी भाव मिळाला.

कोथिंबीर जुडी कमाल 450 - शेतकऱ्यांना मिळालेले भाव पाहता, कोथिंबीर साडेचारशे रुपये जुडी तर मेथी 240 रुपये जुडी असा भाव मिळाला. दहा दिवसांपूर्वी याच बाजार समितीमध्ये कोथंबीरला 250 रुपये जुडी इतका भाव मिळाला होता. यापूर्वी कोथिंबीरला 15 दिवसांपूर्वी अडीचशे रुपये भाव मिळाला होता. सध्या बाजारात कोथिंबीर जुडी कमाल 450 तर किमान 120 रुपये जुडी दराने विक्री होत आहे. तर मेथी जुडी कमाल 250 तर किमान 70 रुपये दराने विक्री होत आहे.

हा दिवस कधीही विसरू शकणार नाही - "मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून शेती व्यवसाय करतो आणि नाशिक बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी घेऊन येतो. मात्र आज माझ्या कोथिंबीरीला पहिल्यांदाच इतका विक्रमी भाव मिळाला, याचा मला आनंद आहे. आम्ही सर्व कुटुंब रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतात पीक घेत असतो. आज खऱ्या अर्थाने आमच्या कष्टाचं चीज झाल आहे. त्यामुळे आजचा बैलपोळा आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही," असं कोथिंबीर उत्पादक शेतकरी भिका ठोंबरे यांनी सांगितलं.

बैलपोळ्याचे गिफ्ट - "मी गेल्या अनेक वर्षापासून शेती करतो आणि नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी घेऊन येतो, आज पहिल्यांदाच माझ्या मेथीला अडीचशे रुपये जुडी इतका विक्रमी भाव मिळाला. बैलपोळ्यानिमित्त खऱ्या अर्थाने हे आमच्यासाठी गिफ्ट ठरलय," असं मेथी उत्पादक शेतकरी मच्छिंद्र शेळके यांनी सांगितलं.

हेही वाचा...

  1. रोजच्या जेवणाची चव वाढवणारी कोथिंबीर भडकली; एका जुडीची किंमत 'तीन अंका'च्या घरात
  2. Prices Fell : भाव कोसळले, साडेतीन एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटाव्हेटर,खर्चही आला अंगलट

Last Updated : Sep 3, 2024, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.