मुंबई Singer Nandesh Umap : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बहुजन समाजवादी पक्षाच्यावतीनं त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये आणखी ट्विस्ट वाढला आहे.
तिरंगी लढत होणार : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुती भाजपाचे मिहिर कोटेचा उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता इथे बहुजन समाजवादी पक्षाकडून प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांना उमेदवारी मिळालीय. त्यांना आज अर्ज दाखल केल्यामुळं येथे आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तसंच मतांचं विभाजन देखील होणार असल्याचं बोललं जातंय. नंदेश उमप यांच्या उमेदवारीचा नक्की फटका कुणाला बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
कलावंतांचे प्रश्न मांडणार : दुसरीकडं अर्ज दाखल केल्यानंतर नंदेश उमप यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आपण समाजकार्यासाठी, कलावंतांसाठी काम करणार आहोत. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण राजकारणात उतरत आहोत, असं नंदेश उमप यांनी सांगितलं. तसंच समाजकार्यासाठी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, असं माला वाटलं म्हणून मी एक वेगळी इनिंग खेळत आहोत. त्यामुळं मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय. दरम्यान, या आधीच्या सरकारमध्ये मी सांस्कृतिक खात्यात काम करत होतो. कलावंतांच्या अडचणी, कलाकारांचे प्रश्न, कलावंतावर होणारे अन्याय आदींचे प्रश्न सोडवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढविण्याच निर्णय घेतला आहे, असं नंदेश उमप यांनी सांगितलं.
हे वाचलंत का :
- अमित शाहांपासून नारायण राणेंपर्यंत उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी; नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर - Uddhav Thackeray Speech
- काँग्रेसची सत्ता आल्यास मराठा आणि धनगरांना आरक्षणात वाटा मिळेल; राहुल गांधींचं आश्वासन - Lok Sabha election
- उत्तर मध्य मुंबईत आता होणार तिरंगी लढत, एमआयएमनं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिला उमेदवार - lok sabha election 2024