ETV Bharat / state

भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डनं केली आत्महत्या... - Buldhana Suicide News - BULDHANA SUICIDE NEWS

Buldhana Suicide News : भाजपाच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा बॉडीगार्ड 'अजय गिरी' यांनी (Ajay Giri Suicide) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपलं जीवन संपवलं.

Suicide News
अंगरक्षकाने स्वतः गोळी झाडून केली आत्महत्या (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 10:24 PM IST

बुलढाणा Buldhana Suicide News : चिखलीच्या भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक पोलीस कर्मचारी 'अजय गिरी' यांनी स्वतःच्या घरात आत्महत्या (Ajay Giri Suicide) केली आहे. या घटनेमुळं बुलढाणा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया देताना अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी आणि आमदार श्वेता महाले (ETV BHARAT Reporter)

घरात केली आत्महत्या : आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदूक देण्यात आली होती. राहत्या घरीच गिरी यांनी आत्महत्या केली. गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णाला दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते.

आज दुपारी 3.30 वाजे दरम्यान पोलीस दलातील पोलीस शिपाई अजय शंकरराव गिरी बक्कल नंबर 404 यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केली. ते मुख्यालय येथे ड्युटीवर होते. ते बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानात राहत होते. साडेतीन वाजता घरी असताना त्यांनी आत्महत्या केली. यामध्ये प्रथमदर्शनी कौटुंबिक कारणामुळं आत्महत्या केल्याचं समजलं आहे. यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे करत आहेत. - बी बी महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक

पोलीस कर्मचारी 'अजय गिरी' आज कर्तव्यावर नव्हते. गेल्या तीन वर्षापासून माझ्याकडं अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. चिखली शहरामध्येच ते लहानाचे मोठे झाले. सुरुवातीला काही काळ ते होमगार्डमध्ये होते. 2009 पासून ते माझ्याकडं येईपर्यंत मुंबई पोलीसमध्ये होते. शिवाजी शाळेमध्ये शिक्षण झालेले अजय गिरी अंगरक्षक तर होते परंतु, ते एका कुटुंबातले सदस्य देखील होते. त्यांचा घरगुती कलह होता आम्ही त्यांना धीर देत होतो. - श्वेता महाले, आमदार

घरघुती कारणावरून आत्महत्या : आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड असलेले अजय गिरी हे आज त्यांच्यासोबत ड्युटीवर नव्हते. अजय गिरी यांनी घरघुती कारणावरून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.

हेही वाचा -

  1. बड्या नेत्यानं आईसह मुलीवर झाडल्या गोळ्या; स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या - Barnala Murder
  2. सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; डोक्यात गोळी झाडून संपवलं जीवन - SRPF Soldier Commits Suicide
  3. पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या - Pune Crime

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.