ETV Bharat / state

मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षातील नेते आग्रही - Shrikant Shinde should get cabinet

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 5:39 PM IST

Shrikant Shinde should get cabinet : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे. शिवसेना पक्षानं खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

Shrikant Shinde
नरेंद्र मोदी, श्रीकांत शिंदे (ETV BHARAT MH Desk)

मुंबई Shrikant Shinde should get cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापना होत आहे. या सरकारमध्ये 'एनडीए'मधील घटक पक्षांनाही समाविष्ट करून घेण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाला 18 मंत्री पद, तसंच घटक पक्षांना 18 मंत्रीपदं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी महाराष्ट्रातील भाजपाच्या दिग्गज नेत्यांसह शिवसेना खासदारांना मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला देखील केंद्रात मंत्रीपदे मिळणार आहेत.

भाजपातील 'या' मंत्र्यांची लागणार वर्णी : भारतीय जनता पक्षातील राज्यातील वरिष्ठ नेते नितीन गडकरी, नारायण राणे, पियुष गोयल या विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय रक्षा खडसे आणि राज्यातील एखाद्या नेत्याची राज्यसभेवर वर्णी लावून त्यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाण्याची शक्यता आहे.

श्रीकांत शिंदेंच्या नावाचा आग्रह : शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा आग्रह करण्यात येत आहे. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. मात्र, त्यांची एवढीचं ओळख नसून त्यांनी त्यांच्या मतदारसंघात गेल्या दोन टर्ममध्ये दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. तसंच त्यांनी केलेल्या विकास कामांमुळं त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केलीय. शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय शिवसेनेचे प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांची नावंसुद्धा मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटातही चुरस : राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक मंत्रिपद दिलं जाणार आहे. या मंत्रिपदासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावं चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रिपद आलं, तर प्रफुल पटेल यांना संधी दिली जाईल. मात्र, राज्यमंत्रीपद मिळाल्यास सुनील तटकरे यांची वर्णी लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आठवलेंना बढतीची शक्यता : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदावर गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी एकही जागा न लढवता भाजपाचा प्रचार केला आहे. त्यामुळं यावेळी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळावी, अशी त्यांनी वारंवार इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का :

  1. शिंदेंचे नव्हे तर ठाकरेंचे आमदार आमच्या संपर्कात; शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा दावा - Lok Sabha Result
  2. कोकण मतदारसंघात चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर जैन यांनी भरला अर्ज - Graduate Constituency Election
  3. मोदी 3.0 : ठरलं! 9 जून रोजी नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ - NDA gov formation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.