ETV Bharat / state

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पौराणिक मातृलिंग दर्शनासाठी गर्दी; वर्षातून केवळ पाच वेळाच मिळते दर्शनाची संधी, घ्या दुर्मीळ शिवलिंग दर्शन - Kolhapur Ambabai Temple - KOLHAPUR AMBABAI TEMPLE

Shravan Somvar Ambabai Temple : श्रावणातील पहिल्या सोमवारी मातृलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची अंबाबाई मंदिरात मोठी गर्दी झाली. तब्बल 71 वर्षांनी हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या श्रावणाची सुरुवात सोमवारी झाल्याचा पवित्र योग जुळून आला. यानिमित्तानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील अंबाबाईच्या गाभाऱ्यावर असलेलं पौराणिक मातृलिंग मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलय.

Shravan Somvar 2024 devotees offer prayers at Ambabai Temple in Kolhapur on first monday of Shravan
अंबाबाई मंदिर कोल्हापूर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 3:59 PM IST

Updated : Aug 5, 2024, 6:12 PM IST

कोल्हापूर Shravan Somvar Ambabai Temple : तब्बल 71 वर्षांनी हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या श्रावणाची सुरुवात सोमवारी झाल्याचा पवित्र योग यंदा जुळून आलाय. या निमित्तानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील अंबाबाईच्या गाभाऱ्यावर असलेलं पौराणिक मातृलिंग मंदिर दर्शनासाठी आज भाविकांना खुलं करण्यात आलं. आई अंबाबाईच्या मंदिरातील मातृलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे या मातृलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येत असल्यानं वर्षातून महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येतं. यामुळं या ठिकाणी भाविक मोठी गर्दी करतात.

अंबाबाई मंदिर कोल्हापूर (ETV Bharat Reporter)

मंदिराचा इतिहास : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं अंबाबाई मंदिर सुमारे 1200 वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात हिंदू देवदैवतांची अनेक मंदिरं आहेत. करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या गाभाऱ्यावर मातृ शिवलिंग मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून महाशिवरात्री आणि प्रत्येक श्रावण सोमवारी मंदिर खुलं करण्यात येतं. तसंच यंदा पहिल्यांदाच श्रावणाची सुरुवात सोमवारी होत असल्याचा दुर्मीळ योगायोग जुळून आला असल्यानं या शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. तसंच महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिरात प्रदक्षिणा घालताना भाविकांना अर्धी प्रदक्षिणा करता येते. मात्र, अंबाबाई मंदिरातील मातृ शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येत असल्यानं या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील शिव मंदिरात भाविकांची गर्दी : शहरातील वटेश्वर, उत्तरेश्वर, रावणेश्वर, जुना बुधवार पेठेतील सिद्धेश्वर मंदिरातही शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटे मोठी गर्दी केली होती. कोल्हापुरातील बुधवार पेठ येथील सुप्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरामध्ये आज पहाटे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिव शंकरांची सालंकृत पूजा बांधण्यात आली. तसंच आज अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं.

हेही वाचा -

  1. पहिला श्रावण सोमवार; परळी वैजनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी - Shravan 2024
  2. प्रसिद्ध 'घृष्णेश्वर" मंदिरात भाविकांची गर्दी; येथे दर्शन घेतल्याशिवाय १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होत नाही - Grishneshwar Temple Shravan 2024
  3. आज पहिला श्रावण सोमवार; महादेवाला वाहावी 'ही' शिवामूठ, सर्व माहिती वाचा एका क्लिकवर - Shravan 2024

Last Updated : Aug 5, 2024, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.