ETV Bharat / state

जनतेला 25 वर्षांपूर्वीची आक्रमक शिवसेना दाखवून द्या, उद्धव ठाकरेंच्या संपर्कप्रमुखांना सूचना - Shivsena UBT

Shivsena UBT Meeting : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. यासाठी पक्षांकडून वेगवेगळी रणनीती आखली जात आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 10:41 PM IST

मुंबई Shivsena UBT Meeting : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकीय पक्षांना लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात होत असून, वेगवेगळ्या प्रकारची रणनीती पक्षांकडून आखली जात आहे. तर दुसरीकडे जागावाटप आणि संघटनात्मक बांधणीबाबत बैठकांचं सत्र देखील सुरु आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून 288 संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवन इथं पार पडली. या बैठकीत गाफिल राहू नका, सावध राहा, कामाला लागा आणि पुन्हा एकदा आक्रमक शिवसेना जनतेला दाखवून द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं.

आठवड्याभरात अहवाल सादर करा : दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी शिवसेना भवन इथं राज्यातील पदाधिकारी, आमदार आणि शिवसेना नेते यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधून कामाला लागा, स्थानिक पातळीवरील लोकांच्या समस्या सोडवा, आपल्या पक्षाची ज्या मतदारसंघात ताकद आहे, तिथं संघटनात्मक बांधणी वाढवा आणि विधानसभानिहाय आठवड्याभरात अहवाल सादर करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिल्या. आजच्या बैठकीत राज्यातील 288 संपर्कप्रमुखांनी उपस्थिती लावली. तसंच पंचवीस वर्षांपूर्वी जी आक्रमक शिवसेना होती. समाजात आक्रमक शिवसेनेची ओळख होती. त्या 25 वर्षांपूर्वीच्या आक्रमक शिवसेनेची ओळख पुन्हा निर्माण करून दाखवा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिले.

संपर्कप्रमुखांचा महाराष्ट्रभर दौरा : आगामी काळात विधानसभा निवडणुका होतील. त्या हेतूनं 288 मतदारसंघातील विधानसभेचा आढावा आणि लोकसभा निवडणुकीचा अहवाल उद्धव ठाकरेंनी मागवलेला आहे. निश्चितच आठ दिवसांच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर ताकदीनं शिवसेना काम करण्यासाठी सिद्ध झालेली आहे. या सगळ्याचा सारासार विचार करुन विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्कप्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर 288 मतदारसंघात होणार आहे, अशा सूचना सगळ्या संपर्कप्रमुखांना देण्यात आल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. मणिपूरबाबत भागवत बोलल्यानंतर आता तरी मोदी मणिपूरला जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल
  2. विधान परिषद निवडणूक 2024 : महाविकास आघाडीत ठिणगी, नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी, काय आहे वादाचं कारण ?
  3. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.