ETV Bharat / state

शिर्डीत कारमधून गांजाची वाहतूक? 26 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - SHIRDI POLICE GANJA ACTION

शिर्डीत नाकाबंदी दरम्यान मंगळवारी (10 डिसेंबर) मध्यरात्री शिर्डी पोलिसांनी सावळीविहीर फाटा येथे 96 किलो गांजा सदृष्य पदार्थ जप्त केला.

SHIRDI POLICE GANJA ACTION
शिर्डी पोलिसांची मोठी कारवाई (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2024, 5:13 PM IST

शिर्डी : मंगळवारी (10 डिसेंबर) मध्यरात्री गस्त घालत असताना शिर्डी पोलिसांनी 14 लाखांचा गांजा सदृश्य पदार्थ, 12 लाखांची चारचाकी गाडी आणि मोबाईल असा एकूण 26 लाख 53 हजार रुपयांचा माल जप्त करत गांजा सदृष्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे.

26 लाख 53 हजार 405 रुपयाचा मुद्देमाल जप्त : उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे आणि पोलीस पथकानं ही कारवाई केली. रात्री साडेबाराच्या सुमारास राहाता तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असलेल्या सावळीविहीर फाटा या ठिकाणी एक ग्रे रंगाची इनोव्हा कार समृद्धी महामार्गावरून उतरुन कोपरगावच्या दिशेनं शिर्डीकडे येत असताना या कारची तपासणी करण्यात आली. कारच्या डिक्कीची तपासणी केली असता त्यात 46 पाकिटात अंदाजे 96 किलो वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आला. सदर गांजा सदृश्य पदार्थाची किंमत अंदाजे 14 लाख 43 हजार असून कारची किंमत अंदाजे 12 लाख रुपये, 10 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 26 लाख 53 हजार 405 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली.

उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली माहिती (Source - ETV Bharat Reporter)

तपास सुरू : अर्जुन धोंडीराम कांबळे (वय- 37 वर्षे, रा. निमगाव कोऱ्हाळे) याच्याकडे गांजा सदृश्य पदार्थ मिळून आला असून, त्याच्याकडे गांजा सदृश्य पदार्थ कुठून आला? आणि तो कुठे विकणार होता? यात त्याच्यासोबत आणखी कोणी आहे का? याचा तपास सुरू आहे. पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईत पोलीस कर्मचारी गजानन गायकवाड, गणेश घुले, केवल राजपूत, प्रसाद सूर्यवंशी यांनी भाग घेतला आहे.

हेही वाचा

  1. ब्रिटिशकालीन कर्नाक पूल जून 2025 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार
  2. 'लालपरी'च्या अपघातात घट झाल्याचा दावा ; नाशिक विभागात एसटीच्या 120 अपघातात 22 ठार, तर 196 जण जखमी
  3. नाशकात थंडीची हुडहुडी; शाळा एक तास उशिराने भरणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.