ETV Bharat / state

शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 1708 मतदान केंद्रावर होणार मतदान - Shirdi Lok Sabha Constituency

Shirdi Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी 13 मे रोजी पार पडत असून सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. मतदान प्रक्रिया निर्भय, सुलभ आणि पारदर्शी पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

Shirdi Lok Sabha Constituency
निवडणूक कर्मचारी (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 8:53 PM IST

शिर्डी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदान प्रक्रियेविषयी माहिती देताना निवडणूक अधिकारी (Reporter)

अहमदनगर (शिर्डी) Shirdi Lok Sabha Constituency : 11 मे रोजी सायंकाळी पाच वाजता अधिकृत जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर प्रशासनाकडून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. आज रविवारी निवडणूक कर्मचारी निवडणूक साहित्य ताब्यात घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे कूच करणार आहेत. शिर्डी लोकसभेच्या 1708 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

शिर्डीत एवढ्या मतदारांचा समावेश : शिर्डी लोकसभा मतदारसंघात 16 लाख 77 हजार मतदारांचा समावेश आहे. शिर्डी लोकसभा कार्यक्षेत्रात 16 लाख 77 हजार 335 मतदार असून यामध्ये 8 लाख 64 हजार 573 पुरूष मतदार, 8 लाख 12 हजार 684 महिला मतदार आणि 78 तृतीयपंथी मतदार आहेत.

कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी 469 वाहने तैनात : शिर्डी लोकसभांतर्गत विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता 156 सेक्टरनिहाय 312 रूट तयार करण्यात आलेले आहेत. 211 एसटी बसेस, 368 जीप, 51 मिनी बस आणि 9 क्रुझर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर अहमदनगर येथे ईव्हीएम मशिन घेऊन जाण्यासाठी 18 कंटेनर वाहने असणार आहेत.

22 मतदान केंद्र नेटवर्क शॅडो एरियात : शिर्डी लोकसभेत 22 मतदान केंद्र नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसलेल्या दुर्गम भागात आहेत. तेथे रनरची व्यवस्था असणार आहे. तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 12 आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत‌. प्रत्येकी 6 महिला, दिव्यांग आणि युवक मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. शिर्डीतील 1708 मतदान केंद्रांसाठी 8 हजार 530 मतदान अधिकारी, कर्मचारी आणि 860 राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचारी संख्या 9 हजार 400, 50 सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत.

केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टिंगची व्यवस्था : शिर्डी लोकसभेतील 1708 मतदान केंद्रांपैकी 854 मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टिंग केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील 12 मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह कॉस्टिंग पाहता येणार आहे. त्याद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष असणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पण मतदान केंद्राचे लाईव्ह कॉस्टिंगद्वारे हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

हेही वाचा:

  1. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान; महाराष्ट्रातील 'या' 11 मतदारसंघांत होणार चुरशीची लढत - Lok Sabha Elections 4th Phase
  2. "संजय राऊतांची सुरक्षा फक्त १५ मिनिटं हटवाच अन्...."; नितेश राणेंचा हल्लाबोल - Nitesh Rane on Sanjay Raut
  3. बीड लोकसभेच्या मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण; 41 उमेदवार अजमावणार नशीब - Beed Lok Sabha Constituency

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.