मुंबई Threat Email To Pavaskar : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असताना आणि राज्यात मराठा बांधवांमध्ये आनंदाचं, जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण असताना (Shiv Sainik Subhash Vikhare) दुसरीकडे राजकीय क्षेत्रातून एक खबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे (शिवसेना) सचिव तथा प्रवक्ते किरण पावसकर यांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मातोश्रीच्या विरोधात बोलू नका : एक ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांच्याकडून मातोश्रीच्या विरोधात बोलू नये, असा ईमेलद्वारे धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. सुभाष विचारे हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. विचारे यांनी किरण पावसकर यांना मेलवरून धमकी दिली आहे. शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेतील फूटीनंतर शिंदे गटाने बंड केले आणि एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. पुढे त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अनेकवेळा आमने-सामने आलेत. तर दोन्ही गट कित्येकवेळा एकमेकांना भिडले आहेत. यादरम्यान, शिंदे गटातील नेते अधिक आक्रमक होत उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या विरोधात बोलत असतात. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. यात किरण पावसकर हे अग्रस्थानी आहेत. त्यामुळे पावसकर यांनी मातोश्रीच्या विरोधात बोलू नये, म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांनी मेलद्वारे पावसकर यांना धमकी दिल्याची माहिती पुढे येत आहे.
धमकीच्या मेलमध्ये काय म्हटलंय? गद्दार! गद्दार! गद्दार! "तुमच्या चाळीस गद्दारांची बाळासाहेबांच्या मातोश्रीशी टक्कर देण्याची लायकी नाही. तुम्ही सर्व चाळीस जण त्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहच्या..... घूसा", असं ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांनी धमकी दिलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे. या धमकीनंतर आता किरण पावसकर हे पोलिसात तक्रार करणार का? की शांत बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यापूर्वीही शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आहे. यात काहींनी निचांकसुद्धा गाठला आहे. पण, यानंतरही दोन गटातील भांडण थांबलेले नाही.
हेही वाचा: