सातारा MLA Shashikant Shinde: कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांनी खासदार उदयनराजेंना (Politics) आयपीएलच्या संघाचे मालक म्हटले होते. त्याबाबत छेडलं असता खासदार शरद पवार यांनीच देशात आयपीएल आणली आहे. (Maharashtra Politics) त्यामुळे कोणता संघ खेळेल, कोणता खेळाडू पुढे येईल हे तेच ठरवतील, असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. (India Politics)
फक्त बाळासाहेबांनीच धाडस दाखवलं: बाबरी ढाचा पाडला त्यावेळी कोणी जबाबदारी घेत नव्हतं. परंतु, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धाडस दाखवलं. शिवसेनेनं बाबरी ढाचा पाडल्याची जबाबदारी घेऊन शिवसैनिकांचा अभिमान असल्याचं बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं. आज मात्र सर्वजण याचं श्रेय घेत आहेत. कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीसांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी असल्याचा टोला आमदार शशिकांत शिंदेंनी लगावला.
आरक्षणाचा प्रश्न किती दिवसात मार्गी लावणार? आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत मार्गी लावणार? हे सरकारनं स्पष्ट करावं, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत ज्या नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे, त्यांच्याबाबत गावबंदीचा निर्णय घेताना विचार केला पाहिजे. अन्यथा सरसकट सर्वच नेत्यांबाबत चुकीचा संदेश जाईल. सरकारनं समाजात तेढ वाढू नये यासाठी प्रयत्न करावे. मुंबईला आंदोलनकर्ते आले तर मुंबई ठप्प होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
तर देशात इतिहास घडेल : आमदार शिंदे म्हणाले, देशाची निवडणूक लोकांनी हातात घेतली तर इतिहास घडेल. अन्यथा पुढील निवडणूक कधी होईल हेही सांगता येणार नाही. भाजपानं इतर पक्षातील मातब्बर नेते पक्षात घेतले. तरीही विरोधकांच्या घरी ईडीच्या धाडी पडत आहेत. हीच का तुमची लोकप्रियता? असा सवालही आमदार शिंदेंनी केला.
श्रीरामाला धर्मात वाटू नका : देवाला धर्मात वाटू नका. प्रभू श्रीराम कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व भारतीयांचे आहेत. देवाला धर्मात वाटून अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा राजकीय इव्हेंट हाेऊ नये. अयोध्येचं मंदिर खूप वर्षांनंतर होत असून त्याचा आनंद आम्हा सर्वांनाच असल्याचं आमदार शिंदे म्हणाले.
हेही वाचा: