ETV Bharat / state

बारामतीमधील संस्थांच्या स्थापनेवेळी आरोप करणारे काय वयाचे होते? शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला - शरद पवार

Sharad Pawar Criticizes Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना मतदारांना भावनिक आवाहन केलं होतं. यावरून शरद पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. विरोधकांप्रमाणे आम्ही भावनात्मक आवाहन करणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar Criticizes Ajit Pawar
शरद पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 8:01 PM IST

पुणे Sharad Pawar Criticizes Ajit Pawar : अजित पवार गटाला पक्ष व चिन्ह मिळाल्यानंतर काका व पुतण्यामधील वाद उफाळून आला. "माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभा राहणार नाही," असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना केलं होतं. याविषयी ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, "याबाबत प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार आहे. भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचं काही कारण नाही. बारामती मतदार संघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्षांपासून ओळखतात. त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही. मात्र ज्या पद्धतीनं विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे. त्या पद्धतीची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद सर्व मतदार घेऊन योग्य निकाल देतील", अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

कृषिमंत्र्यांनी केला हा गंभीर आरोप: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करताना त्यांच्यावर गंभीर आरोप केला. दोन्ही पवारांच्यात जे अंतर पाडले ते जितेंद्र आव्हाड यांनी अंतर पाडले. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना बाजूला सारत जितेंद्र आव्हाड हे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या आरोपाचं खंडन केलं.

शरद पवारांचा मुंडेंना टोला: शरद पवार म्हणाले की, "धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीमधील कालखंड हा आव्हाडांपेक्षा जास्त आहे. त्यांनी देशपातळीवर, राज्य पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर काम केलं. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही काम केलंय. राज्य मंत्रिमंडळामध्येसुद्धा त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी कोणतीही वेगळी भूमिका घेतली असं नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी मुंडे यांना लगावला.

बारामतीत उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधीपासून आहेत. उदाहरणार्थ विद्या प्रतिष्ठान संस्था स्थापन होऊन सुमारे ५४ वर्षे झाली. कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था १९७१ साली स्थापन झाली. या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते? याचे त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तर त्यांच्या आणि लोकांच्याही लक्षात येईल. या प्रकारची भूमिका मांडणं कितपत योग्य आहे? पुणे लोकसभेसाठी उभं राहत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. याला आमची मान्यता आहे.-- शरद पवार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

त्या संबंधी तक्रार करण्याचं काही कारण नाही: बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेसाठी उमेदवार असणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, "लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्या संबंधी तक्रार करण्याचं काही कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. गेली 55-60 वर्ष आम्ही काय केलं हे लोकांना माहित आहे."

हेही वाचा:

  1. 'दंगल' गर्ल सुहानी भटनागरचं निधन, धाकट्या 'बबिता फोगट'नं अवघ्या 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  2. गड किल्ले महाराष्ट्राची अस्मिता; यंदा शिवजयंतीला 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या
  3. टोमॅटोच्या बॉक्समधून चक्क 'कांद्याचं स्मगलिंग'; नागपूर सीमाशुल्क विभागानं सुमारे ८३ मेट्रिक टन कांदा केला जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.