ETV Bharat / state

दीड वर्षापासून एकतर्फी प्रेम, तीन महिने केलं लैंगिक शोषण; गर्भवती राहिल्यानं उडाली खळबळ - Amravati Crime News - AMRAVATI CRIME NEWS

Amravati Crime News : प्रेम दोन व्यक्तींना जवळ आणतं. मात्र, प्रेमाचा गैरअर्थ काढून अनेकजण प्रेमाच्याच नावाखाली गुन्हे करू लागले आहेत. असाच एक प्रकार अमरावती शहरात घडला. लग्नाचं आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार (Sexually Assaulted) करण्यात आलाय. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर बातमी....

Amravati Crime News
फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 8:07 PM IST

अमरावती Amravati Crime News : दोन वर्षांपूर्वी त्याचं वय 19 वर्षे असताना त्यानं तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला (One Sided Love) आणि सतत तिच्या मागावर असायचा. दीड वर्ष सलग असा प्रकार सुरू असताना, आता तीन महिन्यापूर्वी त्याने तिला तिच्याच घरात एकटी असताना गाठलं. तिच्यावर जबरदस्ती केली. झालेला प्रकार कोणाला सांगायचा नाही, मी तुझ्यासोबत लग्न करणार असं म्हणत सलग तीन महिने तो तिचे लैंगिक शोषण करत होता. आता ती गर्भवती असल्याचं सगळ्यांना कळताच खळबळ उडाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात हा प्रकार उघडकीस आला आहे.

असा आहे संपूर्ण प्रकार : अचलपूर तालुक्यात येणाऱ्या धामणी येथील रहिवासी शुभम लक्ष्मण तोटे (21) या युवकाची 2022 मध्ये एका युवतीसोबत ओळख झाली. यानंतर शुभम नेहमी तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ती सतत त्याला टाळायची. सलग दीड वर्ष शुभम एकतर्फी प्रेमातून तिला त्रास देत होता. समाजात बदनामी होईल म्हणून युवतीनं याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. दरम्यान, 21 मार्च 2024 रोजी ती युवती घरात एकटी असल्याचा फायदा घेत शुभम तिच्या घरात गेला आणि तिचे लैंगिक शोषण केले. ही बाब कोणालाही सांगायची नाही अशी धमकी देखील त्यानं युवतीला दिली. यानंतर सलग तीन महिने शुभम तिचे शोषण करत होता. आता युवतीची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं आई-वडिलांनी तिला डॉक्टरांकडं नेलं असता ती गर्भवती असल्याचं कळताच आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली.

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल : आपली मुलगी गर्भवती असल्याचं लक्षात येताच आई-वडिलांनी तिची विचारपूस केली असता, तिनं घडलेल्या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. यानंतर आई-वडिलांनी पथ्रोट पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात शुभम तोटे विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पथ्रोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी दिली.

हेही वाचा -

  1. कमी पैशात बियर दिली नाही म्हणून थेट बारमालकावर ताणली रिव्हॉल्वर; अमरावतीतील घटना - Amravati Crime
  2. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; मेळघाटात दारुड्या मुलानं केली आईची हत्या
  3. Amravati Crime News: विवाहितेचे लैंगिक शोषण; फेसबुकवरून दिली ३५ तुकडे करण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.