मुंबई Eknath shinde : मार्मिकच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाचा आवाज राज्यात बुलंद केला. मात्र, प्रकृती स्वास्थ्याच्या तक्रारींमुळे त्यांना रूग्णालयात ॲडमिट करण्यात आलं आहे. त्यांना बसवण्यात आलेल्या पेस मेकरची बॅटरी बदलायची आहे. त्यासाठी मोठा खर्च होणार आहे. त्यांचं कार्य आणि शिवसेनेसाठी सावंत यांनी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचवली आहे.
शिंदेंनी मदत करून बाजी मारली : शिंदे गटाकडून करण्यात आलेली ही मदत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला निश्चितच चपराक असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे यांनी व्यक्त केलं आहे. "ज्या पंढरीनाथ सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला महाराष्ट्रभरात पोहोचवण्यासाठी परिश्रम केले, त्या सावंत यांना ठाकरे कुटुंबीयांकडून मदत मिळणं अपेक्षित असताना शिंदे यांनी मदत करून बाजी मारली आहे," असं दिलीप सपाटे म्हणाले.
*@CMOMaharashtra निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार श्री.पंढरीनाथ सावंत यांना केला सुपूर्द
— Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) August 3, 2024
ज्येष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ सावंत हे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे सहकारी होते.@MahaDGIPR @DrSEShinde @ANI pic.twitter.com/eaOrnqg1nA
एक लाख 70 हजारांची मदत : पंढरीनाथ सावंत यांच्या वैद्यकीय सुविधेसाठी मुख्यमंत्री निधीतून विशेष सहाय्य देण्यात आलं आहे. 1 लाख 70 हजार रुपयांचा धनादेश त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सुपूर्द केला.
सावंत यांचं मोठं योगदान : यावेळी बोलताना उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "सावंत यांचे शिवसेनेच्या वाटचालीमध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराला मदत करणं हे शिवसेना पक्षाचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सावंत यांना चांगल्या आरोग्याच्या आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत."
हेही वाचा
- “अमित शाह अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज”, उद्धव ठाकरेंचा प्रहार - Uddhav Thackeray on Amit Shah
- "देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; हायकोर्टाचा निकाल दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप - Anil Deshmukh On Sachin Waze
- "ठाकरे आणि पवारांचे विधान...: पाहा ॲड. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले - Adv Prakash Ambedkar