ETV Bharat / state

पुणे ड्रग्ज प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; म्हणाले.... - Pune FC Road Drug Case - PUNE FC ROAD DRUG CASE

Pune FC Road Drug Case : ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये खुलेआम ड्रग्ज विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 10:31 PM IST

मुंबई/पुणे Pune FC Road Drug Case : पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असताना, आता पुण्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले ड्रग्ज घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विद्येचं माहेरघर समजलं जाणाऱ्या पुण्यात राजरोसपणे ड्रग्जची विक्री होत असून, गृहविभाग, सरकार काय करत आहे? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ड्रग्जवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करणार : "ड्रग्ज प्रकरणात पोलीस कडक कारवाई करतील. ड्रग्ज पेडलर, ड्रग्ज सप्लायर्स, विक्रेता यांना आम्ही सोडणार नाही. घटनेच्या मुळापर्यंत जाऊन पोलीस तपास करतील. यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. ड्रग प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच ड्रग्जमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुण्यात खुलेआम ड्रग्ज विक्री : पुण्यात मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज विक्रीचं प्रमाण वाढलं असल्याचं केलेल्या कारवाईवरुन दिसून येत आहे. पुण्यातील गजबजलेल्या एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये खुलेआम ड्रग्ज विक्री होत असल्याचं एका व्हिडिओवरुन दिसून येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी बारवर कारवाई केली असून, पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. तसंच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असल्याची माहिती पुणे पोलीस उपायुक्तांनी दिली.

काही लोकांना बांबू लावले पाहिजेत : "काही लोकांना दररोज उठून सकाळी भोंगा सुरु करण्याची सवय आहे. त्यांचा भोंगा रोज सुरु असतो. अशा लोकांनाही बांबू लावला पाहिजे," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला. यावर तुम्ही कुठला राजकीय बांबू लावणार आहे? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले, "पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबू लावण्यात येतील. बांबूमुळं ऑक्सिजन जास्त मिळतो. त्यामुळं कार्बन डायऑक्साइड शोषून घेतला जातो, म्हणून राज्यात जास्त बांबूची लागवड करण्यात येईल."

'हे' वाचलंत का :

  1. "मनोज जरांगे महाराष्ट्राला लागलेली विकृती"; ओबीसी समाज आक्रमक - Manoj Jarange Patil
  2. उद्धव ठाकरेंना 'ती' पत्रकार परिषद भोवणार? निवडणूक आयोगानं मागवला अहवाल - Uddhav Thackeray
  3. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? ज्याचे जास्त आमदार तो.... - Assembly Election

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.