मुंबई Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात गुन्हे शाखेने दुसरी अटक केली आहे. भावेश भिंडेनंतर (Bhavesh Bhinde) आता होर्डिंगच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला अटक करण्यात आलीय. याप्रकरणात एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडेला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मनोज संघूला अटक : मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात गुन्हे शाखेची आज मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केलीय. मनोज संघु नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला गुन्हे शाखेने अटक केलीय. पालिकेने मान्यता दिलेल्या या स्ट्रक्चरल इंजिनिअरविरोधात अटकेची कारवाई करण्यात आलीय. घाटकोपर येथील दुर्घटना ग्रस्त होर्डिंगला याने स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत पहिली अटक करण्यात आलेल्या भावेश भिंडेची पोलिस कोठडी आज संपली. त्यामुळं त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून कसून तपास आणि चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -
- घाटकोपर होर्डिंग प्रकरण : जीआरपीच्या एसीपीचा नोंदवला जबाब; उद्या भिंडेला करणार न्यायालयात हजर - Ghatkopar Hoarding Collapse Case
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ, 29 मे पर्यंत सुनावली कोठडी - Bhavesh Bhinde Police Custody
- घाटकोपर होर्डिंग प्रकरणात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू, दुर्घटनेचा एसआयटी करणार तपास - ghatkopar hoarding case