ETV Bharat / state

Cameras In Students Toilet : धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या स्वछतागृहात शाळेनेच लावले कॅमेरे, पिंपरी चिंचवडमधील शाळेतील घटना - Education Department

Cameras In Students Toilet : पिंपरी-चिंचवड शहरातील एका हायस्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्कूल प्रशासनानेच मुला-मुलींच्या टॉयलेटमध्ये चक्क सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या घटनेचा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे.

Cameras In Students Toilet
कॅमरा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 10:10 PM IST

शाळेतील वॉशरूममध्ये लावलेल्या कॅमेऱ्याविषयी स्पष्टीकरण देताना अधिकारी

पिंपरी चिंचवड (पुणे) Cameras In Students Toilet : मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याची माहिती असतानाही अशाप्रकारे शाळा प्रशासनाने कॅमेरे लावल्याचा पालकांचा आरोप आहे; मात्र याबाबत पोलिसांकडे अद्याप कोणीही तक्रार देण्यासाठी गेलेले नाही. पिंपरी चिंचवड शहरातील एका हायस्कूलमधील स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर समाज माध्यमातून याबाबत तीव्र आक्षेप घेण्यात आले. तर पालकांनीही याला विरोध केला. याबाबत विचारणा करण्यासाठी शनिवारी (दि. १६) सकाळी शाळेच्या आवारात काही पालकांनी गर्दी केली होती.

शिक्षण विभाग खडबडून जागे : हे सीसीटीव्ही तब्बल पाच ते सहा वर्षांपासून स्वच्छतागृहांमध्ये लावले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागालाही खडबडून जाग आली. प्रशासनाने शाळेत जात तेथील कॅमेरे हटवले. तसेच शाळेला याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही लावणे गुन्हा आहे. हा मुलांच्या गोपनियतेचा भंग आहे. तसेच याबाबतचे व्हिडिओ सामाजिक माध्यमावर गेल्याने शाळा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे सहा वर्षांपासून आहेत. वॉशरुममध्ये कॅमेरे बसवले नसून ते वॉशबेसिनकडे आहेत. त्याठिकाणी मुले हात धुतात. हे कॅमेरे बसवण्यापाठीमागे मुलांची सुरक्षितता हा एकच उद्देश होता. मात्र, पालकांनीच याबाबत तक्रार केल्यानं आता सर्व कॅमेरे काढले आहेत. महिला शिक्षकांची ड्युटी सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत आहे. त्यांना कपडे बदलण्यासाठी सांगितले जात नव्हते. त्यामुळे महिला शिक्षकांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. -- ज्योती मसंद, प्राचार्य

मुलांच्या प्रायव्हसीचा विसर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे कारण देत आम्ही स्कूलच्या टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असा दावा स्कूल प्रशासनाने केला आहे; मात्र विद्यार्थ्यांच्या सेक्युरिटीचं कारण पुढे करत असताना मुलांच्या टॉयलेट मधील प्रायव्हसीचा विसर स्कूल प्रशासनाला पडला आहे. स्कूलमधील टॉयलेटचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षण विभाग देखील खडबडून जागे झाले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित हायस्कूलमध्ये जाऊन गर्ल्स अँड बॉईज स्टुडन्ट टॉयलेटचे सीसीटीव्ही कॅमेरे लगेच काढले आहेत. तसेच या प्रकरणात स्कूल प्रशासनाला नोटीस देऊन या सर्व घटनेची चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Lok Sabha Elections : देशात पहिल्यांदा ‘या’ लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा
  2. Lok Sabha Elections : 12 राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त-निवडणूक आयोग
  3. Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत 17 निर्णय; सगेसोयरे व्याख्येबाबत चार महिन्यात कार्यवाही करणार - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.