ETV Bharat / state

फिलिस्तीनचे समर्थन करणारी पोस्ट लाईक केली अन् गेली नोकरी, मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई - Palestine Supporting Matter

Palestine Supporting Matter : मुख्याध्यापक पदावर राहून फिलिस्तीनचे समर्थन करणारी पोस्ट लाईक करणे मुंबईतील एका महिलेच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने कारवाई करत मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी निलंबित केले आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य ओळखतो; पण, त्याचा इतरांसाठी जबाबदारी आणि आदराने वापर केला पाहिजे, असं मत व्यवस्थापनाने मांडलं आहे.

Palestine Supporting Matter
मुख्याध्यापिका परवीन शेख (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 8:21 PM IST

मुंबई Palestine Supporting Matter : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित नसून आता त्याचा परिणाम भारतातही दिसू लागले आहेत. हमास-इस्रायल संघर्षावर पोस्ट टाकल्याप्रकरणी सोमय्या शाळेच्या प्राचार्या परवीन शेख यांच्यावर शाळा प्रशासनाने कारवाई केली आहे. सोमय्या शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये हमासच्या समर्थनार्थ इस्लामिक कट्टरपंथियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. याबाबत शाळा व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र, परवीन शेख यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर आता शाळा व्यवस्थापनाने त्यांना बडतर्फ करून परवीन शेख यांच्यावर कारवाई केली आहे.

शाळेने मागितला खुलासा : हमास-इस्रायल संघर्षावर पोस्ट टाकल्या प्रकरणी सोमय्या शाळेने शनिवारी त्याच्याकडे खुलासा मागितला होता. आमच्या एकता आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांशी तडजोड होणार नाही. याची पालकांना आणि जनतेला खात्री देण्यासाठी व्यवस्थापनाने सोमय्या विद्याविहारशी परवीन शेख यांचा असलेला संबंध संपुष्टात आणल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

काय म्हणाले शाळा व्यवस्थापन? : यासंदर्भात माहिती देताना व्यवस्थापनाच्या सदस्यांनी सांगितले की, आमच्या लक्षात आले आहे की, सोमय्या स्कूलमध्ये मुख्याध्यापक पदावर असलेल्या परवीन शेख यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरील भूमिका आमच्या मूल्यांशी जुळत नाहीत. सोमय्या विद्याविहार येथे, आम्ही असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जिथं सामाजिक जाणीव येते आणि समाजातील सर्व सदस्यांची उन्नती होते. क्षुल्लक विचारसरणी आणि वैयक्तिक पूर्वग्रहांच्यावर उठून आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे समर्थन करतो. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य ओळखतो पण, त्याचा इतरांसाठी जबाबदारी आणि आदराने वापर केला पाहिजे.

काय म्हणाल्या परवीन शेख? : याप्रकरणी परवीन शेख म्हणाल्या की, आम्ही कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहोत. व्यवस्थापनाकडून टर्मिनेशनची नोटीस मिळण्यापूर्वीच सोशल मीडियावर माझ्या टर्मिनेशनबद्दल चर्चा सुरू होत्या. तिथे मला कळलं. हे कळल्यावर मला धक्का बसला. कामावरून काढण्याची नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मी शाळेला माझे शंभर टक्के योगदान दिल्याचे परवीन शेख सांगतात. राजीनामा देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता. परवीन शेख या 12 वर्षांपासून या शाळेत कार्यरत आहेत. त्यांना 7 वर्षांपूर्वी शाळेचे मुख्याध्यापक पदी बढती देण्यात आली होती.

उमर खालिदचा समर्थक असल्याचा आरोप : परवीन शेख यांनी X खात्यावर लाईक केलेल्या पोस्टच्या आधारे, त्यांच्यावर 'हमास समर्थक', 'हिंदूविरोधी' आणि 'इस्लामवादी उमर खालिद'चा समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला. शाळेच्या या निर्णयावर परवीन शेख यांनी 'व्यवस्थापनाने माझ्या विरोधात सुरू केलेल्या या निंदनीय ट्रोलिंगला तोंड देत मला साथ दिली नाही. उलट झुंडीला बळी पडून ही कठोर आणि अन्यायकारक कारवाई केली याचं मला आश्चर्य वाटलं.

हेही वाचा :

  1. 91 वर्षीय आजोबांनी घरबसल्या बजावला मतदानाचा हक्क, कुटुंबीयांनी मानले निवडणूक आयोगाचे आभार - Lok Sabha Election 2024
  2. शरद पवारांनी फेकला नवा राजकीय बॉम्ब, उद्धव ठाकरेंची होणार का अडचण? - Sharad Pawar
  3. धाराशिवसह संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब; नामांतरण केल्यानं नुकसान होणार नसल्याचं उच्च न्यायालयाचं निरीक्षण - Bombay high court

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.